शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
3
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
4
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
5
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
6
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
7
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
8
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
9
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
10
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
12
अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."
13
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
14
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसं मिळवायचं, जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं
15
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
16
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
17
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
19
अरेरे! १.२५ लाख पगार, नवरदेवाने दाखवली सॅलरी स्लीप पण ऐनवेळी नवरीने दिला नकार, कारण...
20
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!

पावसात भिजत सुटीचा आनंद : अनेक मंडळांचा सामाजिक संदेशांवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 4:42 AM

दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन झाल्यावर रविवारी गणेशभक्तांनी येऊनजाऊन असणा-या पावसात भिजत सार्वजनिक मंडळांनी साकारलेल्या संदेशात्मक देखावे पाहिले.

ठाणे : दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन झाल्यावर रविवारी गणेशभक्तांनी येऊनजाऊन असणा-या पावसात भिजत सार्वजनिक मंडळांनी साकारलेल्या संदेशात्मक देखावे पाहिले.ठाण्यात गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून उभारल्या जाणाºया देखाव्यांची संख्या गेल्या काही वर्षांत कमी झाली असली तरी ठराविक मंडळे मात्र अविरतपणे विविध विषयांवर आकर्षक आणि संदेशात्मक देखावे उभारतात. ते पाहण्यासाठी गणेशोत्सवात आलेल्या सलग सुट्टयांमधील आजचा शेवटचा दिवस सत्कारणी लावला.दरवर्षीप्रमाणे यंदाही मंडळांनी सामाजिक आणि प्रबोधनात्मक देखावे उभारले आहेत. एका मंडळाने मंदिरातील गाभारे, तर कुणी पारंपारिक राजमहल, शिशमहल उभारून बाप्पाचा शाही थाट केला आहे. अनेक मंडळांनी ‘झाडे लावा, झाडे जगवा, पाणी जीवन आहे, जपून वापरा, निसर्गाचा ºहास करू नका’ या विषयावरील देखावे उभारून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यावर भर दिला आहे. त्यातही कुणी गणेश मंडपातच कुंडीमध्येच छोटी रोपे लावून स्वत:पासून त्याची सुरुवात केली आहे. ठाणे महापालिकेतील गणेशोत्सवात ‘स्मार्ट सिटी’चा आकर्षक देखावा उभारण्यात आला आहे.ठाण्यातील एका मंडळाने मात्र ‘स्मार्ट सिटी’ या विषयावर भर देत त्याअंतर्गत आपण जेव्हा स्मार्ट सिटीची स्वप्ने पाहतो तेव्हा शहरातील शिल्लक असलेल्या प्रमुख समस्या दाखवून त्या प्राधान्याने सुटाव्या, सोडवाव्या याकडे लक्ष वेधले आहे. साधारण १०-१२ मिनिटाचा तो देखावा आहे.एका मंडळाने ‘शर्यत रे आपुली’ या विषयाच्या माध्यमातून आजच्या स्पर्धात्मक युगात माणूस जन्मापासून ते मृत्यूपर्यंत कायम विविध कारणास्तव धावत असतो. तो शांत नसतोच. कोणतीही गोष्ट मिळविण्यासाठी त्याची शर्यत सुरू असते, हे सुमारे १० मिनिटांत दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. देखाव्याबरोबरच मंडपातील आकर्षक रोषणाई लक्षवेधी ठरत होती. देखावे पाहत अनेक जण त्याचे फोटो काढण्यात दंग होते. 

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव