लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी केलेल्या जातिवाचक टिप्पणीचा शुक्रवारी निषेध करण्यात आला. शिवसेनेसह पीआरपी, रिपाइं व भारिप पक्षाच्या नेत्यांनी आयुक्तांवर अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करा, असे निवेदन पोलीस उपायुक्त सुनील भारद्वाज यांना दिले. आयुक्तांनी प्रसारमाध्यमे व नागरिकांसमोर जाहीर क्षमा मागितल्यास, कारवाईची मागणी मागे घेऊ, असे या वेळी सांगण्यात आले. बुधवारी अचानक पक्षाकडे कायद्यानुसार पुरेसे संख्याबळ नसल्याचे कारण आयुक्तांनी देत, रिपाइं आठवले गट, भारिप, पीआरपी व काँॅग्रेस पक्ष गटनेत्यांच्या केबिन सील केले. या प्रकाराने पक्षाचे नगरसेवक संतप्त झाले. रिपाइंचे गटनेते व शहरजिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांनी याबाबत आयुक्तांना जाब विचारण्यावरून वाद झाला.
‘निंबाळकरांविरोधात अॅट्रोसिटी दाखल करा’
By admin | Published: July 08, 2017 3:41 AM