शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

उत्साहात रंगली पापड रेसिपी क्वीन स्पर्धा, विजया महाडिक ठरल्या पापडक्वीन  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2018 6:41 AM

वन मिनिट गेम शो, आॅन द स्पॉट पापड रेसिपीचे प्रात्यक्षिक, पापडापासून बनवलेल्या विविध लज्जतदार रेसिपी स्पर्धा आणि या सगळ्याला सखींनी दिलेला भरभरून प्रतिसाद... असे उत्साही वातावरण पाहायला मिळाले, ते बुधवारी ठाण्यात.

ठाणे : वन मिनिट गेम शो, आॅन द स्पॉट पापड रेसिपीचे प्रात्यक्षिक, पापडापासून बनवलेल्या विविध लज्जतदार रेसिपी स्पर्धा आणि या सगळ्याला सखींनी दिलेला भरभरून प्रतिसाद... असे उत्साही वातावरण पाहायला मिळाले, ते बुधवारी ठाण्यात. निमित्त होते, ‘लोकमत सखी मंच आणि रामबंधू’ आयोजित पापड रेसिपी क्वीन स्पर्धेचे. प्रसिद्ध अभिनेत्री सुरूची अडारकर हिच्या उपस्थितीने या कार्यक्रमाला अधिक रंगत आली.वसंतराव नाईक सभागृह येथे हा कार्यक्रम उत्साहात रंगला. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर, अभिनेत्री सुरूची अडारकर (डॉ. अंजली) हिच्याशी गप्पांचा कार्यक्रम रंगला. नंतर, फूड फूड टीव्ही फेम नामवंत शेफ शंतनू गुप्ते यांनी सखींना पापड नूडल्स स्प्रिंग रोल, पापड पनीर फ्री टर्सची रेसिपी करून दाखवली. त्याचबरोबर सखींना साध्यासोप्या कुकिंग टिप्स दिल्या. उपस्थित सखींना रामबंधूतर्फे पापड रेसिपी बुकचेही वाटप करण्यात आले. याचदरम्यान पापड शब्द वापरून सखींसाठी उखाणे स्पर्धा घेण्यात आली. सखींनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन उखाणे सादर केले.पापड रेसिपी स्पर्धेत सुमारे ५० सखींनी सहभाग घेतला होता. यात पापड पराठा, पापड चाट, पापड कचोरी चाट, पापड समोसा, पापड पिझ्झा, पापड लाडू, पापड चॉकलेट रोल्स, पापड सॅण्डवीच असे चटकदार पदार्थ तयार करून आणले होते. या स्पर्धेचे परीक्षण गौरी गुजर आणि शंतनू गुप्ते यांनी केले. या स्पर्धेत पाच विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.यावेळी रामबंधूचे मार्केटिंग मॅनेजर भानुदास गुंडकर, जनरल मॅनेजर सेल्स संजीव निगम, मुंबईचे रिजनल मॅनेजर श्रीकांत तिवारी, विभागीय सेल्स अधिकारी सुरेश सनस, अरुण राणे तसेच रामबंधूचे स्थानिक विक्रेते किरण मुदाले (शिवतेज एंटरप्रायजेस) उपस्थित होते. कुणाल रेगे यांनी खुमासदार शैलीत निवेदन केले.गप्पा डॉ. अंजलीशीच्मराठीमध्ये पहिल्यांदाच डॉक्टर या क्षेत्राशी निगडित असलेल्या मालिकेसाठी माझी निवड झाल्याचा मला आनंद आहे. आपण अनेकदा डॉक्टर्सना नावं ठेवतो. त्यांच्या कामावर शंका उपस्थित करतो, मात्र आता ती भूमिका करताना डॉक्टरांच्या जबाबदारीची मला जाणीव झाली, असे मत डॉ. अंजली अर्थात सुरूचीने व्यक्त केले.च्अभिनय क्षेत्रात करिअर करण्याच्या निर्णयाला आईवडिलांनी मला पूर्ण पाठिंबा दिला. या क्षेत्रात पैसा, ग्लॅमर सगळं असलं तरी खूप मेहनत करावी लागते. कधीकधी तर आम्ही सलग दोनतीन दिवस सेटवरच शूटिंगमध्ये व्यस्त असतो, असे अनुभव तिने सांगितले.च्कोणतीही कला जोपासताना वयाचा विचार करू नका. गृहिणींकडे अनुभव आणि पुरेसा वेळ असतो. ती कर्तव्यदक्ष असते, तत्पर असते. त्यामुळे एखाद्या सखीने ठरवले तर ती कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकते. फक्त योग्य निर्णय घ्या आणि मेहनत करा, असा सल्ला तिने उपस्थित सखींना दिला. 

टॅग्स :thaneठाणेnewsबातम्या