शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायली नागरिक अचानक भारत सोडून जाऊ लागले; पर्यटनाचे बुकिंग रद्द, विमाने फुल
2
"एकनाथ शिंदे दावोसमध्ये हॉटेलचं बिल न देताच..." जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
3
'सुप्रिया सुळेंना फुकटचं खायची सवय, १५०० दिले तर पवारांच्या...', भाजप आमदाराची टीका
4
Smart SIP Vs Regular SIP : स्मार्ट आणि रेग्युलर SIP मध्ये फरक काय, ५००० रुपयांतून २३ लाखांची होईल अधिक कमाई; कशी?
5
"सिंचन घोटाळा झाल्याचं पंतप्रधान मोदींनीच कबूल केलं"; पृथ्वीराज चव्हाणांनी अजित पवारांना पुन्हा डिवचलं
6
शाळेतून परतणाऱ्या मुलींची छेड काढणाऱ्यांचा 'हाफ एन्काऊंटर'; आरोपींचा पोलिसांवर गोळीबार
7
Suraj Chavan : १४ लाख अन् १० लाखांचा व्हाऊचर आणि..., बिग बॉस जिंकल्यानंतर सूरज चव्हाणला किती रुपये मिळाले?
8
'तो जिंकला अन् १ तासात गाणं तयार केलं', उत्कर्ष शिंदेने बनवलेलं सूरज चव्हाणवरचं धमाकेदार गाणं ऐकाच
9
अमेरिकेच्या अ‍ॅडवायझरीनंतर कराची विमानतळाबाहेर बॉम्बस्फोट; दोन परदेशी नागरिकांचा मृत्यू
10
छत्रपतींचे स्मारक कधी होणार? संभाजीराजेंचे टार्गेट भाजप; अरबी समुद्रात शिवस्मारक शोध आंदोलन
11
ओलाच्या सर्व्हिसवरून कुणाल कामरा-भाविश अग्रवाल भिडले; लोकांनी मालकाला आरसा दाखविला...
12
"शिवसेना वाढण्यासाठी हजारो शिवसैनिकांच्या हत्या"; रामदास कदमांचे वक्तव्य, म्हणाले "उद्धव ठाकरेंना याची..."
13
आजचे राशीभविष्य ७ ऑक्टोबर २०२४; धनलाभ होईल, येणारी बातमी...
14
“स्मारकाविरोधात कोर्टात जाणारे कोण तेही बघा”; देवेंद्र फडणवीसांचा संभाजीराजेंवर पलटवार
15
'त्या' सगळ्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार: ठाकरे, शिंदेसेनेचे माजी नगरसेवक उद्धवसेनेत
16
“हिऱ्याच्या पोटी गारगोटी, मुलाशी का, बापाशी भिडा”; CM एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान
17
“लोकसभेची गणिते वेगळी होती, मनसेबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील”: श्रीकांत शिंदे
18
मराठी अभिजात भाषा झाली तरी जल्लोष का नाही?: राज ठाकरे, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
चांगल्यांचा सन्मान अन् वाईटांना शिक्षा करीत नाही ते म्हणजे सरकार: नितीन गडकरी
20
चेंबूरमध्ये अग्नितांडव, दुकानातील रॉकेलच्या साठ्याचा भडका; एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू

प्रभाग हितासाठी नाही तर स्वयंम हितासाठी प्रवेश, आनंद परांजपे यांचा जगदाळे यांच्यावर आरोप

By अजित मांडके | Published: February 13, 2023 3:28 PM

घटनाबाह्य सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जगदाळे यांना क्लस्टरचे जे अर्थकारण दाखविले असेल तेच त्यांना अधिक महत्वाचे वाटले असेल.

ठाणे :

घटनाबाह्य सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जगदाळे यांना क्लस्टरचे जे अर्थकारण दाखविले असेल तेच त्यांना अधिक महत्वाचे वाटले असेल. एका बाजूला शरद पवार यांनी त्यांना दिलेला मानसन्मान, पदे असताना जगदाळे यांनी ‘क्लस्टरचे अर्थकारण’ आपलेसे करुन पक्षांतर केले आहे. क्लस्टरमध्ये लोकांचा विकास करता-करता त्यांना स्वत:चाच “स्वयंविकास”देखील बांधकाम व्यावसायिक म्हणून करायचा असेल. म्हणूनच त्यांचे हे अर्थकारण त्यांना लखलाभ असो,  असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेत केला.

हणमंत जगदाळे यांनी आपल्या तीन नगरसेवकांसह बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. याबाबत आनंद परांजपे यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली. आनंद परांजपे म्हणाले की, क्लस्टरचा विषय हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांचाच आहे. त्यांच्याच संकल्पनेतून क्लस्टर डेव्हलपमेंट या शब्दाचा जन्म झाला. त्यांनीच आपल्या सरकारच्या विरोधात मोर्चा काढून ही योजना राबविण्याचा आग्रह धरला होता. आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री असताना सिडकोसोबत सामंजस्य करार झाला, अशी माहिती आहे. संजीव जयस्वाल हे ठामपाचे आयुक्त असताना क्लस्टरचे ४४ यूआरपी जाहीर झाले. त्यामध्ये ६० हेक्टरवर शास्त्री नगर, सहकार नगर आणि लोकमान्य नगरमध्ये ही योजना राबविण्याचे गृहीत धरण्यात आले. एकदा शासनाने योजना जाहीर केल्यानंतर त्याभागातील नगरसेवक कुठल्या पक्षाचा आहे, यावर शासनाची योजना ठरत नसते. मग, तो राष्ट्रवादीचा असो, की शिवसेना-भाजपचा आहे; यावर शासनाचे धोरण ठरत नसते. त्यांनी जे वक्तव्य केले आहे की, क्लस्टरला अधिक गती देण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांचा हात हातात घेतला आहे. जगदाळे यांनी आपल्या भाषणात ते बांधकाम व्यावसायिक असल्याचे म्हणाले. त्यामुळे त्यांना एफएसआय, टीडीआर जास्त कळत असेल. क्लस्टरमध्ये लोकांचा विकास करता करता त्यांना स्वयंविकास देखील बांधकाम व्यावसायिक म्हणून करायचा असेल. याबद्दल बांधकाम व्यावसायिक म्हणून तेच सांगू शकतील. त्यांचे एसआरएचे अनेक प्रकल्प सुरु आहेत.मध्यंतरी एका जागरुक ठाणेकराच्या माध्यमातून तसेच वृत्तपत्रातून समजले होते की येऊरमध्ये त्यांची २४ बंगल्यांची योजना सुरु आहे. त्या प्रकल्पाला वनखात्याने परवानगी दिलेली नाही. परंतु समितीच्या पुढील बैठकीमध्ये या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याची माहिती आपणांसमोर येणारच आहे. पूर्वी, इकोसेन्सेटीव्ह झोन असल्याने त्याची परवानगी सीसीच्या वेळीच आणणे गरजेचे होते. आता ती प्लींथपर्यंत आणली तरी चालणार आहे. त्यामुळे हा एक प्रकल्पही मार्गी लागावा, अशी त्यांची मानसिकता असेल. असा आरोपचइ त्यांनी केला. शकुनी मामा हे आता ज्योतिषही बघतात का?आपणाला माहित नव्हते की, शकुनी मामा यांचे महापौरपद गेल्यानंतर त्यांनी पार्टटाईम ज्योतिष सांगण्याचा व्यवसाय सुरु केला आहे का असा सवाल त्यांनी केला. १४ फेब्रुवारीपासून सर्वोच्च न्यायालयात १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात नियमित सुनावणी सुरु होत आहे. त्यामुळे हे १६ आमदार अपात्र ठरल्यावर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री राहितील का,; बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे अस्तित्व राहिल का; वेळ अशी येईल का की त्यांना कमळाबाईमध्ये प्रवेश करुन आपली राजकीय वाटचाल करावी लागेल का;  हे भविष्य त्यांनी आधी बघावे असा टोलाही त्यांनी नरेश म्हस्के यांचे नाव न घेता लगावला.

उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व लादले, हा कांगावा उद्धव ठाकरे हे आपल्यावर लादलेले नेतृत्व आहे, असे शिंदेगटाकडून बोलले जात आहे, याबाबत विचारले असता आनंद परांजपे यांनी १९९६ सालचे एक छायाचित्र दाखवून, त्यात आपले वडील प्रकाश परांजपे हे खासदार म्हणून निवडून आलेे. त्यावेळी आनंद दिघे यांनी प्रकाश परांजपे यांना घेऊन मातोश्री गाठली होती. त्याप्रसंगी उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे कार्याध्यक्षही नसताना त्यांची भेट घेऊन सत्कार केला होता. म्हणजेच आनंद दिघे आणि प्रकाश परांजपे यांनीही उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व मान्यच केले होते. बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार हे उद्धव ठाकरे हेच आहेत, हे त्या पिढीतील या दोन्ही जणांनी मान्य केले होते. असे ते म्हणाले.