भिवंडी : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर ठाणे ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस विरेन दयानंद चोरघे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी युवक काँग्रेस पक्षामध्ये युवकांनी मोठ्या संख्येने प्रवेश केला.यावेळी कार्यकर्त्यांना नियुक्ती पत्र देऊन पद वाटप देखील करण्यात आले.
तालुक्यातील खारबांव, महापोली, कोन गाव येथील युवक या पक्ष प्रवेशात सहभागी झाले होते. युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष संदेश वखारे यांनी कार्यकर्ते पदाधिकारी यांना पदांचे वाटप करुन तालुका कमिटी देखील जाहीर केली.यावेळी युवक काँग्रेस ठाणे जिल्हा उपाध्यक्ष निलेश भोईर,ठाणे जिल्हा राजीव गांधी पंचायत राज संघटन अध्यक्ष पंढरी भोईर,भिवंडी ग्रामीण सरचिटणीस मनोज ठाकरे, भिवंडी ग्रामीण काँग्रेस सचिव दुर्गेश नाईक,सचिव कैलास भोईर,अल्पसंख्याक नेते मुफसील पटेल समवेत इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.