शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
3
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
4
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
5
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
6
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
7
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
9
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
10
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
11
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
12
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
13
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
14
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
15
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
16
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
17
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
18
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
19
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
20
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी

गणरायाची मंडपांऐवजी मंडळांच्या कार्यालयात स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 12:58 AM

यंदाचा गणेशोत्सव रस्त्यावर मंडप टाकून साजरा न करता मंडळांच्या कार्यालयातच साजरा करण्याचे ठरविले आहे.

ठाणे : गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आल्याने शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साधेपणाने तो साजरा करण्याचे ठरविले आहे. यात वर्तकनगरमधील दोन गणेशोत्सव मंडळांनी गर्दी होऊ नये म्हणून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव रस्त्यावर मंडप टाकून साजरा न करता मंडळांच्या कार्यालयातच साजरा करण्याचे ठरविले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने साधेपणाने उत्सव साजरे करण्याचे आवाहन केल्यानंतर सरकारच्या आवाहनाला शहरातील मंडळांनी प्रतिसाद देऊन आपापल्या स्तरावर उपाययोजना केल्या आहेत. रस्त्यावर मंडप घातल्यास गर्दी होईल, त्यामुळे ती टाळण्यासाठी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वर्तकनगर येथील जय भवानी युवक प्रतिष्ठान व महात्मा जोतिबा फुले रहिवासी मंडळ या मंडळांनी आपल्या मंडळाच्या कार्यालयांत गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे.यंदा दोन्ही मंडळे शाडूमातीच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करणार आहेत. ‘जय भवानी’तर्फे दरवर्षी पाच दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. मात्र, यंदा ते दीड दिवसच साजरा करणार आहेत. हा निर्णय तीन महिन्यांपूर्वीच घेतल्याचे मंडळाचे संयोजक अजय मिश्रा यांनी सांगितले.महात्मा जोतिबा फुले रहिवासी मंडळ हे ४० वर्षांपासून उत्सव साजरा करीत आहे. यंदा मंडळाच्या कार्यालयात श्रींची स्थापना करण्याचे त्यांनी ठरवले आहे.