अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदेने महावीर जयंतीची सुटी रद्द करून तो दिवस कर्मचाºयांनी भरावे, असे पत्रक काढले होते. मात्र अनेक अधिकारी आणि कर्मचाºयांनी मात्र हा आदेश धुडकावत चक्क सुटीचा आनंद घेतला. परिणामी, पालिकेत केवळ मोजकेच अधिकारी आणि कर्मचारी हजर होते.गुरुवारी महावीर जयंती, शुक्रवारी गुड फ्रायडे आणि त्या पाठोपाठ ३१ मार्च, शनिवारी असल्याने त्या दिवशी दांडी मारायची आणि पुन्हा रविवार, अशी सलग चार दिवस सुटी घेण्याचे बहुतेक सरकारी कर्मचारी आणि अधिकाºयांचे प्लॅनिंग होते. मात्र मार्चचा शेवटचा आठवडा असल्याने कर भरणाºयांची होणारी गर्दी आणि इतर सुटीचे दिवस सलग आल्याने गुरुवारची सुटी रद्द करुन त्या दिवशी अधिकारी आणि कर्मचाºयांनी पालिकेत हजर राहून काम करावे, असे आदेश काढले होते. मात्र, हा आदेश न पाळत अनेक कर्मचाºयांनी गुरुवारी दांडी मारली. त्यामुळे पालिका कार्यालयात शुकशुकाट पसरला होता. मोजकेच अधिकारी आणि कर्मचारी हजर राहिल्याने घरपट्टी विभागाचे काम वगळता इतर विभागातील काम होऊ शकलेले नाही. त्यातच नगरसेवक आणि सभापती देखील पालिकेला सुटी असेल, या कारणाने कार्यालयात आले नाहीत. तर महावीर जयंतीची सुटी असल्याने कार्यालय बंद असेल, या समजापोटी नागरिकही आपली कामे घेऊन पालिकेत फिरकले नाहीत.
सुटी रद्द केल्यानंतरही कर्मचाऱ्यांची दांडीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 2:03 AM