सदानंद नाईक,उल्हासनगर : कॅम्प नं-३ येथील टेलिफोन एक्सचेंज शेजारील ७०५ भूखंडावरील उद्यान अतिक्रमण पासून वाचविण्यासाठी आमदार कुमार आयलानी यांनी सरंक्षण भिंतीसाठी निधी दिला. मात्र गेल्या दोन महिन्यापूर्वी पोस्टरबाजी होऊनही संरक्षण भिंतीच्या कामाला मुहूर्त लागला नसल्याने, टीकेची झोळ उठली आहे.
उल्हासनगरात महापालिका शाळेच्या मैदानावर सनद, वालधुनी नदी किनारील पूरग्रस्त जागेवर सनद, खुल्या जागा, शासकीय कार्यालयाच्या जागा आदिवर प्रांत कार्यालयाकडून सनद दिल्या जात असल्याने, प्रांत कार्यालाय वादात सापडले आहे. त्याप्रमाणे कॅम्प नं-३, टेलिफोन एक्सचेंज येथील ७०५ आरक्षित भूखंडावर महापालिकेने उद्यान विकसित केले. मात्र उद्यानाला अतिक्रमानाचा विळखा पडला आहे. त्यापासून सुटका होण्यासाठी आमदार कुमार आयलानी यांनी संरक्षण भिंतीसाठी निधी दिला आहे. दिवाळीपूर्वी गाजतवाजात आमदार कुमार आयलानी यांनी उद्यानात पोस्टरबाजी केली असून पोस्टर फाटत आहेत. मात्र अद्यापही संरक्षण भीतीच्या कामाला सुरुवात झाली नाही.
महापालिकेचे ७०५ भूखंडावर विकसित केलेले उद्यान हे भूमाफिया, स्थानिक नेते आदींच्या गळ्यात जाण्यापूर्वी ते वाचविण्याची मागणी होत आहे. आमदार कुमार आयलानी यांनी पुढाकार घेतल्यास उद्यानाला लागलेले अतिक्रमनाचे ग्रहण सुटणार आहे. तसेच संरक्षण भिंत बांधल्यास, उद्यान वाचणार असून महापालिका यांनीही याबाबत आक्रमक भूमिका घेण्याची गरज असल्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे.