शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
6
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
7
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
8
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
9
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
10
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
11
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
12
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
13
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
14
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
17
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
18
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
19
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
20
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन

वेळ वाढविली तरी ३० टक्केच बार, हॉटेल सुरू; कामगारांची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 11:35 PM

ठाण्यात ११.३० पर्यंत मुभा, शहरातील हॉटेल, बार, फूडकोर्ट, रेस्टॉरंट हे ५ ऑक्टोबरपासून सुरू झाले होते.

ठाणे : मिशन बीगिनअंतर्गत शहरातील हॉटेल, बार, फूडकोर्ट शनिवारपासून रात्री ११.३० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा ठाणे महापालिकेने दिली आहे. मात्र, शहरातील ३० टक्केच हॉटेल सुरू झाले आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे गावाला गेलेले कामगार अद्याप परतलेले नाहीत. त्यामुळे मनुष्यबळाची समस्या भेडसावत आहे. तसेच ४० टक्के हॉटेल व्यावसायिकांची पुन्हा व्यवसाय सुरू करण्याची मानसिकताच नसून त्यांनी हॉटेलच विकण्यास काढल्याची माहिती मिळत आहे.

शहरातील हॉटेल, बार, फूडकोर्ट, रेस्टॉरंट हे ५ आॅक्टोबरपासून सुरू झाले होते. ठाण्यातील केवळ १० टक्केच बार या दिवशी सुरू झाले होते. या हॉटेल आणि बारवाल्यांचा खरा व्यवसाय हा सायंकाळी ७ नंतर सुरू होतो. त्यामुळे बार असोसिएशनने याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर, शिष्टमंडळाने पालिका आयुक्तांची भेट घेतल्यानंतर आता १० आॅक्टोबरपासून पालिकेने आदेश जारी करून वेळ वाढवली आहे. यानंतरही शहरातील ३० टक्केच हॉटेल, बार सुरू झाल्याची माहिती बार असोसिएशनने दिली. कामगार नसल्याने १०० टक्के हॉटेल सुरू करता येणे शक्य नाही. कामगारांना संपर्क केला असता परिस्थिती पूर्णपणे निवळेपर्यंत येण्यास नकार देत आहेत. सात महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्याने अनेकांची आर्थिककोंडी झाल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.वेळ वाढवण्यात आली; मात्र कामगारांची समस्या आमच्यासमोर आहे. तसेच नव्याने हॉटेल सुरू करताना त्याचा आर्थिक भार उचलण्याची ताकद आता अनेकांमध्ये नाही. त्यामुळे आजही शहरातील ३० टक्केच हॉटेल, बार सुरू झालेले आहेत. - रत्नाकर शेट्टी, सदस्य, ठाणे हॉटेल्स ओनर्स असोसिएशन

टॅग्स :thaneठाणेhotelहॉटेल