मुंब्रा : मध्य रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठी मुंब्य्राजवळील रेतीबंदर रस्त्यावर बांधण्यात येणाऱ्या लोखंडी पुलासाठी टाकण्यात येणाऱ्या गर्डरचे काम तिसऱ्या दिवशीही पूर्णच होते. शनिवारी रात्री सुरू केलेले हे काम नियोजनानुसार रविवारी रात्री पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु, गर्डर बसवताना तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने कामाला विलंब होत असून, मंगळवारीही ते अपूर्ण होते. यामुळे या रस्त्यावरून तसेच बायपास रस्त्यावरून होणारी वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू केलेली नसून ठाणे ते पनवेलच्या दिशेची फक्त एक मार्गिका सर्व वाहनांसाठी खुली केली आहे, तर पनवेल ते ठाणे दरम्यानची मार्गिका फक्त हलक्या वाहनांसाठी खुली केली आहे. या मार्गिकेवरील (पनवेल ते ठाणे) अवजड वाहनांची वाहतूक सलग तिसऱ्या दिवशीही बंद होती. ती पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती, अशी माहिती मुंब्रा (उपविभाग) वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.
तिसऱ्या दिवशीही गर्डर बसविण्याचे काम अपूर्णच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 4:38 AM