शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
3
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
5
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
6
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
7
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
8
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
9
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
10
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
11
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
12
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
13
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
14
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
15
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
16
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
17
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
18
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
19
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
20
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार

काम संपल्यावरही प्रवासी वेठीस, रेल्वेचे टीमवर्क आणि ४०० टन वजनाची लिफ्टिंग क्रेन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 12:39 AM

रेल्वेचे टीमवर्क आणि ४०० टन वजनाची लिफ्टिंग के्रन

अनिकेत घमंडी

डोंबिवली : ठाकुर्ली येथील पादचारी पुलाचे गर्डर टाकण्याचे काम बुधवारी सकाळी सव्वानऊ ते दुपारी १२ वाजून ५५ मिनिटांच्या कालावधीत पूर्ण करण्यात आले. अभियंता विभागाने काम ५० मिनिटे आधीच पूर्ण केले असतानाही रेल्वेने पावणेदोन वाजेपर्यंत ट्रॅफिक ब्लॉकची मंजूर करवून घेतलेली मुदत पूर्ण केल्याने प्रवाशांचे हाल झाले. विकासकामे करण्याकरिता ब्लॉक घ्यायला काहीच हरकत नाही. मात्र, नियोजन न केल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले, अशी सार्वत्रिक भावना आहे.

पुलाच्या कामासाठी कल्याण ते डोंबिवली मार्गावर दोन्ही दिशांवर साडेचार तास रेल्वेसेवा ठप्प होती. त्यामुळे या ब्लॉकचा सर्वाधिक फटका डोंबिवली, दिव्याच्या प्रवाशांना बसला. डोंबिवलीत संतप्त प्रवाशांनी स्थानक प्रबंधकांना धारेवर धरले, तर दिव्यात रेल्वे प्रवासी रेल्वेमार्गात उतरले होते. मात्र, पोलिसांनी वेळीच पावले उचलल्याने परिस्थिती नियंत्रणात राहिली. डोंबिवली स्थानकात अडकून पडलेल्या प्रवाशांनी तेथील फलाट गर्दीने फुलून गेल्याचे फोटो सोशल मीडियावर टाकले आणि रेल्वेच्या नियोजनशून्य कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी प्रवाशांना शांत राहण्याचे आवाहन केले. फलाट क्रमांक १ ए, २, ३ आणि ५ वर प्रवाशांची तुडुंब गर्दी जमली होती. सव्वानऊ वाजता ब्लॉक सुरू झाल्यावर विशेष लोकलकरिता प्रवाशांनी फलाट १ ए व २ वर गर्दी केली.सकाळी सव्वानऊ ते १० वाजून ६ मिनिटे विशेष लोकल न आल्याने सगळा गोंधळ उडाला. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळवणे पोलिसांनाही कठीण गेले. दीर्घकाळ लोकल न आल्याने प्रवाशांचा संताप अनावर झाला होता. ते पाहून पवार यांनी रेल्वे वरिष्ठांशी संपर्क केला. त्यानंतर, सकाळी १० वाजण्याच्या सुमारास एक लोकल आली. त्यात दिवा, कोपरच्या प्रवाशांनी गर्दी केल्याने डोंबिवलीच्या प्रवाशांना त्यात घुसण्याकरिता झटापट करावी लागली. यामुळे डोंबिवलीकर आणखीनच संतापले. स्थानक प्रबंधकांशी प्रवाशांची वादावादी झाली. त्यानंतर, आलेल्या गाड्या तुलनेने रिकाम्या आल्याने कशीबशी गर्दी नियंत्रणात आली. ब्लॉकच्या कालावधीत डोंबिवली- सीएसएमटी मार्गावर नऊ विशेष लोकल सोडण्यात आल्या.

दिव्यातही भरपूर गर्दी होती. रेल्वेगाड्या येत नसल्याने प्रवासी रेल्वेमार्गातच उभे होते. आता ते तेथेच बैठक मारून आंदोलन सुरू करतील, अशी भीती पोलिसांना वाटत होती. परंतु, पुलाचे काम होणे गरजेचे असल्याचे आवाहन प्रवाशांना केल्यावर आणि पोलिसांनी तातडीने रेल्वेमार्गातील प्रवाशांना तेथून हुसकावल्याने दिव्यात आंदोलन झाले नाही, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी अ‍ॅड. आदेश भगत यांनी दिली. लोकल येत नसल्याने अनेक प्रवासी माघारी गेल्याचेही ते म्हणाले. कल्याण ते कसारा, कर्जत मार्गावरील विशेष लोकलसेवा सुरळीत सुरू होती, त्यामुळे कल्याण स्थानकातील गर्दी वगळता अन्य स्थानकांत फारसा गोंधळ झाला नाही. परंतु, लोकलसेवेचा बोजवारा उडाल्याबद्दल कल्याण स्थानकात अडकलेल्या प्रवाशांमध्येही नाराजी होती. लांब पल्ल्यांच्या प्रवाशांचे हाल झाले. काहींनी कसारा, इगतपुरी येथूनच रस्तामार्गे मुंबई गाठण्यासाठी धावपळ केली. मात्र, ठिकठिकाणच्या वाहतूककोंडीने त्यांचेही हाल झाले. ज्यांनी लोकलनेच प्रवास केला, त्यांचा प्रवास रखडत झाला. कर्जत, पनवेलमार्गे दिव्यात आलेल्या प्रवाशांनाही गर्दी व गोंधळाचा फटका बसला. दुपारी सेवा सुरळीत होईस्तोवर सामान, कुटुंबासमवेत त्यांना विविध स्थानकात ताटकळत बसावे लागले.रेल्वेचे टीमवर्क आणि ४०० टन वजनाची लिफ्टिंग के्रनच्पादचारी पुलासाठी ४०० मेट्रीक टन वजनाचे सहा मीटर रुंदीचे चार गर्डर टाकण्यासाठी बुधवारी सकाळी ९.३० पासून सुरुवात झाली. गर्र्डर ठेवण्यासाठी ४०० टन वजनाची खास क्रेन घटनास्थळी आणण्यात आली होती. मध्य रेल्वेचे वरिष्ठ अभियंता (नॉर्थ झोन) दत्तात्रेय लोलगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू होते. ओव्हरहेड वायर, वीजपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता रमेशन, सहअभियंता आर.एन. मैत्री या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत १०० कर्मचाऱ्यांनी गर्डर उभारण्याचे काम केले.च्क्रेन ठाकुर्ली पूर्वेला उभी करण्यात आली होती. त्यात लिफ्टिंग क्रेनचे तज्ज्ञ हजर होते. त्यांनी काम पूर्णत्वास नेले. वरिष्ठ अभियंता लोलगे यांच्या माहितीनुसार, त्या ठिकाणी गर्डर घेऊन रेल्वेची विशेष गाडी आली होती. एकेक गर्डर आधी खाली घेण्यात आला. त्यानंतर, ते वर चढवण्यात आले. प्रत्येक गर्डर वर चढवण्याकरिता साधारण २० मिनिटांचा कालावधी लागला. एक गर्डर पूर्णपणे बसवण्यासाठी, वेल्डिंग, नटबोल्ड, ब्रिकवर्कअशा अन्य तांत्रिक कामांसाठी सुमारे दीड तास लागला.च्रेल्वेच्या क्रेनने हे काम करण्यासाठी वेळ लागला असता. त्यासाठी विशेष प्रकल्पांसाठी लागणारी खासगी लिफ्टिंग क्रेन मागवण्यात आली होती. त्यामुळे गर्डर चढवण्याचे कामजलदगतीने झाल्याचा विश्वास अधिकाºयांनी व्यक्त केला. काम पूर्ण झाल्यानंतर ब्लॉक संपला असल्याचे जनसंपर्क अधिकारी डॉ. ए.के. सिंग यांनी जाहीर केल्यानंतर सहाव्या मार्गिकेवरून सर्वप्रथम दुपारी १ वाजून ५० मिनिटांनी पहिली राजधानी एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने धावली. त्यानंतर हळूहळू वाहतूक पूर्वपदावर आली.च्सहा मीटर रुंदीच्या या पादचारी पुलासाठी सुमारे तीन कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून मार्च महिन्यापर्यंत तो पूर्ण होईल, अशी शक्यता अधिकाºयांनी व्यक्त केली. वेळेत काम सुरू केल्याने रेल्वे प्रशासनाने दुपारी १२ वाजून ५५ मिनिटांनी म्हणजे ब्लॉकच्या पावणेदोन वाजण्याच्या मुदतीपूर्वी ५० मिनिटे आधीच काम पूर्ण केले. दरम्यान, नवीन पादचारी पूल उभारल्यानंतर सध्या डोंबिवली दिशेला असलेला पादचारी पूल पाडण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेlocalलोकलMumbaiमुंबई