अखेर शिवसेनेच्या मदतीने कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष मनोज शिंदे यांनी केला मागच्या दाराने महापालिकेत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 04:23 PM2018-07-20T16:23:06+5:302018-07-20T16:27:38+5:30

स्विकृत नगरसेवकाच्या मुद्यावरुन सुरु असलेले लॉबींग अखेर शमले आहे. कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष मनोज शिंदे यांची शिवसेनेच्या मदतीने स्विकृत सदस्यपदी निवड झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची  घोर निराशा झाली आहे.

Eventually, city city president Manoj Shinde, with the help of Shivsena, entered Municipal Corporation by the previous door. | अखेर शिवसेनेच्या मदतीने कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष मनोज शिंदे यांनी केला मागच्या दाराने महापालिकेत प्रवेश

अखेर शिवसेनेच्या मदतीने कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष मनोज शिंदे यांनी केला मागच्या दाराने महापालिकेत प्रवेश

googlenewsNext
ठळक मुद्देमहासभेत गोंधळराष्ट्रवादीची अखेर घोर निराशा

ठाणे - स्विकृत सदस्य निवडीच्या मुद्यावरुन कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या श्रेष्ठींच्या वादात प्रशासनाने सावध भुमिका घेतल्याने अखेर शिवसेनेच्या मदतीने कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष मनोज शिंदे यांच्या गळ्यात स्विकृत सदस्यपदाची माळ पडली आहे. तर शिवसेनेच्या वतीने दशरथ पालांडे, राजेंद्र साप्ते आणि जयेश वैती यांची निवड करण्यात आली असून भाजपाच्या वतीने शहर अध्यक्ष संदीप लेले यांची देखील मागच्या दरवाजाने पालिकेत प्रवेश मिळविला आहे.
                  शुक्रवारी स्विकृत सदस्य निवडीच्या मुद्यावरुन राष्ट्रवादीने आधीच आक्षेप घेतला होता. राष्ट्रवादीचे तौलानिक संख्याबळ अधिक असतांनासुध्दा पालिका प्रशासनाने कॉंग्रेसच्या सदस्याची स्विकृतपदासाठी वर्णी लावण्याचा घाट घातल्याचा आरोपही त्यांनी केला होता. तर कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मनोज शिंदे आणि राष्ट्रवादीच्या वतीने शरद पवार यांनी मनोहर साळवी यांच्यासाठी लॉबींग सुरु केले होते. अखेर शुक्रवारच्या महासभेत पाच स्विकृत सदस्यांची नावांचा लिफाफा फोडण्यात आल्यानंतर सचिव अशोक बुरपुल्ले यांनी शिवसेनेच्या वतीने जयेश वैती, राजेंद्र साप्ते, दशरथ पालांडे आणि भाजपाच्या वतीने संदीप लेले यांच्या नावांची घोषणा केली. परंतु मनोहर साळवी यांच्याबाबतचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट असल्याने त्यांच्या नावाबाबत राज्य शासनाच्या विधि विभागाकडून अभिप्राय घेतला जाणार असून त्यांच्याकडून आक्षेप आला नाही तर साळवी यांचे नाव घोषीत केले जाईल. परंतु आक्षेप घेण्यात आला तर दुसऱ्या नावाची घोषणा केली जाईल. तो पर्यंत पाचवे नाव स्थगित ठेवण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रशासनाने आपली खेळी केल्याने राष्ट्रवादीने सुटकेचा निश्वास टाकला असतांनाच सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी अन्य दोन नावे कोणाची होती, असा सवाल उपस्थित केला. त्यानुसार सचिवांनी मिलिंद साळवी आणि मनोज शिंदे यांची नावे जाहीर केली. त्यानंतर महाराष्ट्र अधिनियमाचा आधार घेत पिठासीन अधिकारी तथा महापौर मीनाक्षी शिंदे यांनी मनोज शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर सभागृहात गोंधळ झाल्याने महापौरांनी जेवणाची सुट्टी जाहीर केली.
 

चौकट - पाच स्विकृत सदस्यांची यापूर्वीच दिड वर्षापूर्वी म्हणजेच २० एप्रिल २०१७ रोजी महापौरांनी नावे जाहीर केली होती. त्यामध्ये जयेश वैती, दशरथ पालांडे, राजेंद्र साप्ते, भाजपाचे संदीप लेले आणि राष्टÑवादीच्या मनोहर साळवी यांचा समावेश होता. हाच मुद्दा उपस्थित करुन शुक्रवारच्या महासभेत राष्ट्रवादीने आधीच नावे घोषीत केली असतांना आता पुन्हा नव्याने नाव घोषीत करणे उचित नसल्याचे सांगितले. त्यावेळस प्रशासनाने या नावांबाबत आक्षेप घेत हा अधिकार प्रशासनाचा असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आज झालेल्या महासभेत मात्र महापौरांनी मनोहर साळवी ऐवजी कॉंग्रेसच्या मनोज शिंदे यांचे नाव घेतल्याने पुन्हा नव्याने अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
 

चौकट - शुक्रवारी झालेल्या महासभेत स्विकृत सदस्य निवडीच्या मुद्यावरुन वादळ पेटणार असल्याचे सर्वांनाच माहित होते. परंतु असे असतांना क्लस्टरची लक्षवेधी चर्चेला न घेतल्याचे कारण पुढे करीत कॉंग्रेसचे गटनेते विक्रांत चव्हाण यांनी सभात्याग केला. परंतु त्यानंतरच कॉंग्रसेचे मनोज शिंदे यांची स्विकृत नगरसेवक म्हणून घोषणा करण्यात आली. त्यामुळे चव्हाण यांच्यावर जाणून बाजून सभात्याग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात येऊन प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

 

Web Title: Eventually, city city president Manoj Shinde, with the help of Shivsena, entered Municipal Corporation by the previous door.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.