शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

अखेर शिवसेनेच्या मदतीने कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष मनोज शिंदे यांनी केला मागच्या दाराने महापालिकेत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 4:23 PM

स्विकृत नगरसेवकाच्या मुद्यावरुन सुरु असलेले लॉबींग अखेर शमले आहे. कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष मनोज शिंदे यांची शिवसेनेच्या मदतीने स्विकृत सदस्यपदी निवड झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची  घोर निराशा झाली आहे.

ठळक मुद्देमहासभेत गोंधळराष्ट्रवादीची अखेर घोर निराशा

ठाणे - स्विकृत सदस्य निवडीच्या मुद्यावरुन कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या श्रेष्ठींच्या वादात प्रशासनाने सावध भुमिका घेतल्याने अखेर शिवसेनेच्या मदतीने कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष मनोज शिंदे यांच्या गळ्यात स्विकृत सदस्यपदाची माळ पडली आहे. तर शिवसेनेच्या वतीने दशरथ पालांडे, राजेंद्र साप्ते आणि जयेश वैती यांची निवड करण्यात आली असून भाजपाच्या वतीने शहर अध्यक्ष संदीप लेले यांची देखील मागच्या दरवाजाने पालिकेत प्रवेश मिळविला आहे.                  शुक्रवारी स्विकृत सदस्य निवडीच्या मुद्यावरुन राष्ट्रवादीने आधीच आक्षेप घेतला होता. राष्ट्रवादीचे तौलानिक संख्याबळ अधिक असतांनासुध्दा पालिका प्रशासनाने कॉंग्रेसच्या सदस्याची स्विकृतपदासाठी वर्णी लावण्याचा घाट घातल्याचा आरोपही त्यांनी केला होता. तर कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मनोज शिंदे आणि राष्ट्रवादीच्या वतीने शरद पवार यांनी मनोहर साळवी यांच्यासाठी लॉबींग सुरु केले होते. अखेर शुक्रवारच्या महासभेत पाच स्विकृत सदस्यांची नावांचा लिफाफा फोडण्यात आल्यानंतर सचिव अशोक बुरपुल्ले यांनी शिवसेनेच्या वतीने जयेश वैती, राजेंद्र साप्ते, दशरथ पालांडे आणि भाजपाच्या वतीने संदीप लेले यांच्या नावांची घोषणा केली. परंतु मनोहर साळवी यांच्याबाबतचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट असल्याने त्यांच्या नावाबाबत राज्य शासनाच्या विधि विभागाकडून अभिप्राय घेतला जाणार असून त्यांच्याकडून आक्षेप आला नाही तर साळवी यांचे नाव घोषीत केले जाईल. परंतु आक्षेप घेण्यात आला तर दुसऱ्या नावाची घोषणा केली जाईल. तो पर्यंत पाचवे नाव स्थगित ठेवण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.प्रशासनाने आपली खेळी केल्याने राष्ट्रवादीने सुटकेचा निश्वास टाकला असतांनाच सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी अन्य दोन नावे कोणाची होती, असा सवाल उपस्थित केला. त्यानुसार सचिवांनी मिलिंद साळवी आणि मनोज शिंदे यांची नावे जाहीर केली. त्यानंतर महाराष्ट्र अधिनियमाचा आधार घेत पिठासीन अधिकारी तथा महापौर मीनाक्षी शिंदे यांनी मनोज शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर सभागृहात गोंधळ झाल्याने महापौरांनी जेवणाची सुट्टी जाहीर केली. 

चौकट - पाच स्विकृत सदस्यांची यापूर्वीच दिड वर्षापूर्वी म्हणजेच २० एप्रिल २०१७ रोजी महापौरांनी नावे जाहीर केली होती. त्यामध्ये जयेश वैती, दशरथ पालांडे, राजेंद्र साप्ते, भाजपाचे संदीप लेले आणि राष्टÑवादीच्या मनोहर साळवी यांचा समावेश होता. हाच मुद्दा उपस्थित करुन शुक्रवारच्या महासभेत राष्ट्रवादीने आधीच नावे घोषीत केली असतांना आता पुन्हा नव्याने नाव घोषीत करणे उचित नसल्याचे सांगितले. त्यावेळस प्रशासनाने या नावांबाबत आक्षेप घेत हा अधिकार प्रशासनाचा असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आज झालेल्या महासभेत मात्र महापौरांनी मनोहर साळवी ऐवजी कॉंग्रेसच्या मनोज शिंदे यांचे नाव घेतल्याने पुन्हा नव्याने अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. 

चौकट - शुक्रवारी झालेल्या महासभेत स्विकृत सदस्य निवडीच्या मुद्यावरुन वादळ पेटणार असल्याचे सर्वांनाच माहित होते. परंतु असे असतांना क्लस्टरची लक्षवेधी चर्चेला न घेतल्याचे कारण पुढे करीत कॉंग्रेसचे गटनेते विक्रांत चव्हाण यांनी सभात्याग केला. परंतु त्यानंतरच कॉंग्रसेचे मनोज शिंदे यांची स्विकृत नगरसेवक म्हणून घोषणा करण्यात आली. त्यामुळे चव्हाण यांच्यावर जाणून बाजून सभात्याग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात येऊन प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस