लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाण्यातील आपल्याच सोने चांदीच्या दुकानातून बेपत्ता झालेले सोने चांदीच्या दागिन्यांचे व्यापारी भरत हरितमल जैन (४३, रा. निळकंठ सोसायटी, मखमली तलाव, ठाणे) यांचा मृतदेह कळवा आणि नारपोली पोलीस ठाण्याच्या सीमेवरील खाडीत हात पाय बांधलेल्या अवस्थेमध्ये मिळाला आहे. त्यामुळे खूनानंतर त्यांना खाडीमध्ये फेकल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.कळवा खाडीमध्ये शुक्रवारी आढळलेला अनोळखी मृतदेह म्हणजे ठाण्यातून पाच दिवसांपूर्वी बेपत्ता झालेले सोने चांदीच्या दागिन्यांचे व्यापारी भरत हरितमल जैन (४३, रा. निळकंठ सोसायटी, मखमली तलाव, नौपाडा, ठाणे) यांचाच असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले. जैन यांच्या नातेवाईकांनीही त्यांच्या कपडयांवरुन तसेच पॅन्टच्या खिशामध्ये मिळालेल्या त्यांच्या मोटारीच्या चावीवरुन त्यावर शिक्कामोर्तब केले. निळकंठ सोसायटीमध्ये वास्तव्याला असलेल्या जैन यांचे चरईतील दगडी शाळेजवळ दत्त अपार्टमेंटमध्ये बी. के. ज्वेलर्स हे दुकान आहे. १४ आॅगस्ट २०२१ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ज्वेलर्सच्या दुकानात जात असल्याचे पत्नीला त्यांनी सांगितले. त्यानंतर मात्र, ते परतलेच नाही. ते न परतल्यामुळे तसेच शोध घेऊनही ते न सापडल्यामुळे कुटूंबीयांनी अखेर १५ आॅगस्ट रोजी याप्रकरण्ी नौपाडा पोलीस ठाण्यात त्यांच्या अपहरणाची तक्रार दाखल केली होती. यापूर्वीही व्यापारी मनसुख हिरेन हे बेपत्ता झाल्यानंतर त्यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीत आढळला होता. त्यामुळेच या प्रकरणाचाही पोलिसांनी अत्यंत गांभीर्याने तपास करावा. यात घातपाताचा संशय असून दुकानात जबरी चोरीनंतर कोणीतरी त्यांचे अपहरण केल्याची शक्यताही भरत यांचे भाऊ सुनिल जैन यांनी व्यक्त केली होती. दुर्दैवाने, शुक्रवारी (२० आॅगस्ट रोजी) देखिल कळवा पोलिसांना एक अनोळखी मृतदेह कळवा आणि नारपोली पोलीस ठाण्याच्या सीमेवरील खाडीत मिळाला. हा मृतदेह मोठया प्रमाणात कुजलेल्या अवस्थेत होता, त्यामुळे तो ओळखण्याच्या पलिकडे होता. त्याच्या हाता पायांना दोरीने बांधलेले आढळल्यामुळे जैन यांच्या कुटूंबीयांनाही बोलविण्यात आले. मृतदेह कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठविण्यात आला होता. तिथेच जैन यांचे भाऊ आणि पत्नीने तो सायंकाळी उशिरा ओळखल्याची माहिती सूत्रांनी दिली.* एका संशयिताला घेतले ताब्यात-गेल्या चार ते पाच दिवसांपासून या अपहरण प्रकरणाचा तपास करणाऱ्या नौपाडा पोलिसांनी यातील एका संशयिताला शुक्रवारी ताब्यात घेतल्याचे समजते. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला जात असल्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांनी सांगितले.
अखेर ठाण्यातील त्या सराफाचीही हत्या करुन मृतदेह खाडीत फेकल्याचे उघड
By जितेंद्र कालेकर | Published: August 20, 2021 10:01 PM
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाण्यातील आपल्याच सोने चांदीच्या दुकानातून बेपत्ता झालेले सोने चांदीच्या दागिन्यांचे व्यापारी भरत हरितमल जैन ...
ठळक मुद्देआणखी एका मनसुख हिरेनची पुनरावृत्तीकुटूंबीयांची भीती खरी ठरली