ठाणे : कोरोना काळात मुख्यमंञी राज्यातील जनतेला 'तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो' असे निक्षून सांगत होते. माञ तरीही हजारो सर्वसामान्य गरीब रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळाला नसून त्यांनी खाजगी रुग्णालयाची बिलं स्वत:च्या खिशातून भरलेली आहेत. या रुग्णांच्या बिलाची रक्कम योजनेच्या नियमानुसार धनादेशाद्वारे त्यांना परत मिळवून देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज ठाणे जिल्हाधिकार्यांकडे केली. याबाबत मनसेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्यांशी चर्चा केली असून या मागणीचा सकारात्मक विचार होईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला देण्यात आले आहे.
ठाणे शहरातील महात्मा फुले योजनेतंर्गत येत असलेल्या रुग्णालयातील बेडची यादी जाहीर करण्याची मागणी मनसेसह बाकीच्या पक्षातील लोकप्रतिनिधींनी केली. माञ प्रशासन त्याला दाद देत नसून या लालफिती कारभारात गोरगरीब रुग्णांच्या खिशाला अव्वाच्या सव्वा बिलामार्फत काञी बसत आहे. त्यामुळे विमा कंपन्यांच्या कॅशलेस मेडिक्लेम योजनेत कंपनीला बिल सादर केल्यानंतर सर्व रुग्णांना रुग्णालयात भरलेल्या पैशांचा परतावा मिळतो. अगदी त्याच धर्तीवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील पात्र परंतु लाभ न मिळालेल्या रूग्णांच्या बिलाची रक्कम परत करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे केली. याबाबत संदीप पाचंगे यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदनच सादर केले असून या योजनेतील ञुटी दूर करुन गोरगरीब रुग्णांना प्रशासनाने आधार देण्याची मागणी पाचंगे यांनी केली. या प्रकरणी जिल्हाधिकारी नार्वेकर यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत या मागणीचा विचार करुन त्याची लवकरच अमंलबजावणी करण्यासाठी पावलं उचलली जातील, असे मनसेच्या शिष्टमंडळाला सांगितले. यावेळी मनविसेचे शहराध्यक्ष किरण पाटील उपस्थित होते.---------------------------------------------------------------किती रुग्णांची बिलं माफ केली जाहीर कराखासगी रुग्णालयांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत किती रुग्णांची बिलं माफ केली. या संर्दभात यादी जाहीर करावी. दर्शनी भागात या योजनेतील अारक्षित बेडची यादी, मदतीसाठी संपर्क क्रमांक रुग्णालयाने जाहीर करावा. तरच गोरगरिब रुग्णांची कोरोनाकाळातील वणवण थांबणार आहे.- संदीप पाचंगे, जिल्हाध्यक्ष, मनविसे. विभाग अध्यक्ष (ओवळा माजीवडा विधानसभा)