कल्याण : साऊंड आणि लायटिंगसाठी सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या ६६ डेसिबलच्या आवाजाच्या मर्यादेत ध्वनिक्षेपणाचे काम करणे शक्य नाही. त्यामुळे डेसिबलची मर्यादा वाढवून देण्याच्या मागणीसाठी प्रोफेशनल आॅडिओ अॅण्ड लायटिंग असोशिएशन अर्थात ‘पाला’तर्फे १५ आॅगस्टला ‘साऊंड म्यूट डे’ पाळला जाणार आहे, अशी माहिती कोअर कमिटीचे सदस्य राजू नायडू यांनी दिली.ही ‘आवाजबंदी’ त्या दिवशी राज्यभरात असेल. या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि ती मर्यादा वाढवून द्यावी, या मागणीसाठी दीड महिन्यात न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्याचा निर्णय कोअर कमिटीने घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या ‘साऊंड म्यूट डे’ मुळे १५ आॅगस्टची देशभक्तीपर गीते, त्याचदिवशी साजºया होणाºया दहीहंडीच्या डीजेची धम्माल ऐकायला मिळणार नाही. सारे काही शांततेत-आवाजविरहित पार पडेल, असे सांगत नायडू म्हणाले, ‘पाला’ ही संघटना देशातील २५ राज्यांसह केंद्रशासित प्रदेशात कार्यरत आहे. देशभरातील १० लाख लोकांचा पोटा-पाण्याचा व्यवसाय ‘साऊंड आणि लायटिंग’वर अवलंबून आहे. सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी आवाजावर मर्यादा घालून दिली आहे. त्यात ६६ डेसिबलपेक्षा जास्त आवाजाची मर्यादा ओलांडणाºया साऊंट व लायटिंग व्यावसायिकांवर पोलिस गुन्हे दाखल करतात. ही मर्यादा पाळत साऊंड सिस्टिम चालविणे शक्य नाही. सरकारने तर साऊंडचे परवाने देणे बंद केले आहे. अनेकांनी लाखो रुपये खर्च करुन साऊंड सिस्टिम खरेदी केली आहे. केवळ ठाणे जिल्ह्यात ३५० पेक्षा जास्त साऊंड सिस्टिम चालविणारे व्यावसायिक आहेत. आवाजाच्या मर्यादेमुळे या व्यावसायिकांचे मरण ओढवले आहे.आम्हाला न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करायचे नाही. तसेच आवाजाची मर्यादाही ओलांडायची नाही. सरकारने आवाजाच्या मर्यादेचा फेरविचार करावा. तसेच ६६ डेसिबलच्या मर्यादेपेक्षा आमच्या व्यवसायाला आवश्यक असलेली आवाजाची मर्यादा वाढवून द्यावी, अशी आमची मागणी असल्याचे नायडू यांनी सांगितले.गप्पाही मर्यादेबाहेरन्यायालयाने घेतलेल्या निर्णयातील त्रुटी दाखवून देताना नायडू म्हणाले, जेव्हा दोन व्यक्ती परस्परांशी गप्पा मारतात तेव्हा त्याचीच पातळी अनेकदा ६६ डेसिबलच्या मर्यादेपेक्षा जास्त असते. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रम किंवा जेथे ध्वनिक्षेपकांचा वापर होतो अशा कार्यक्रमांत आवाजाची ही पातळी राखणे कठीण आहे.साऊंड सिस्टिम चालविणारा तांत्रिक शिक्षण घेतलेला असतो. पोलीस उद्धट वर्तन करतात. लाठी उगारतात. तसेच प्रसंगी त्यांच्या साऊंड सिस्टिमचे नुकसान करतात. हा आमचा उद्योग आहे. पण पोलीस आम्हाला गुन्हेगारासारखी वागणूक देतात. गैरवर्तन करतात. त्याचाही त्रास होतो. याकडे नायडू यांनी लक्ष वेधले.