शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
2
Exit Poll: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; सूचक विधान करत म्हणाले, “मतदानाचा टक्का...”
3
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
4
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
5
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
6
इलॉन मस्क यांनी पुन्हा केलं चकित, स्टारशिप यानातून अवकाशात पाठवली केळी; केला अभूतपूर्व प्रयोग
7
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
8
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
9
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
10
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
11
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
12
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
13
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
14
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
15
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
16
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
17
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
18
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
19
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
20
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार

भाजपच्या माजी नगरसेवकावर वीज चोरीचा गुन्हा; वीज मीटरमध्ये छेडछाड

By धीरज परब | Published: October 27, 2023 12:14 PM

भाजपाच्या गणेश गोपाळ शेट्टी या माजी नगरसेवकांवर वीजचोरीचा गुन्हा अदानी वीज कंपनीने नवघर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे .

धीरज परब

मीरारोड - भाजपाच्या गणेश गोपाळ शेट्टी या माजी नगरसेवकांवर वीजचोरीचा गुन्हा  अदानी वीज कंपनीने नवघर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे .  अदानी वीज कंपनीच्या दक्षता विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश भोसले हे सहकारी मनोज मांजरेकर व कर्मचारी यांच्या सह भाईंदर पूर्वेला आरएनपी पार्क भागात कोळी नगर येथील प्रथमेश पार्टी ग्राऊंड च्या वीज पुरवठाची तपासणी करत होते .  तेथील वीज मीटर मध्ये फेरफार व छेडछाड करून अनधिकृत वीज पुरवठा घेतला गेल्याचे आढळून आले . त्यासाठी बेकायदा वायरी जोडण्यात आल्या होत्या . 

अदानीच्या अधिकाऱ्यांनी तेथे असलेल्या देवेंद्र पाटील यांच्या कडे चौकशी केली असता जागेचे मालक गणेश शेट्टी असल्याचे व भाडेतत्वार ग्राउंड चालवत असल्याचे सांगितले .  वीज मीटर शेट्टी च्या नावे असून तपासणीत जून २०२२ ते ऑक्टोबर २०२३ दरम्यान १४ हजार १२७ युनिट व २ लाख ८६ हजर रुपयांची वीज चोरी असल्याचे निष्पन्न झाले . या प्रकरणी भारतीय विद्युत अधिनियम नुसार भोसले यांच्या फिर्यादी वरून बुधवारी नवघर पोलीस ठाण्यात गणेश शेट्टी व देवेंद्र पाटील विरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . हवालदार व्हनमारे तपास करत आहेत . 

भाईंदर पूर्वेला अण्णा पॅलेस ऑर्केस्ट्रा बार मधील अश्लील आणि अनैतिक प्रकारां बाबत देखील भाजपाचे गणेश शेट्टी विरुद्ध नवघर पोलीस ठाण्यात पिटा सह विविध गुन्हे दाखल आहेत . सदर बार चे बांधकाम अनधिकृत असून देखील कारवाई होत नसल्याचे आरोप आहेत .

जोपर्यंत देवेंद्र फडणवीस मनावर घेत नाहीत तोपर्यंत एकनाथ शिंदे कितीही शपथा घेतील त्या शपथांची किती पूर्तता होईल या बद्दल माझ्या मनात शंका आहे, असंही भास्कर जाधव म्हणाले.