शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

हिंदू-मुस्लीम ऐक्याची मिसाल

By admin | Published: April 19, 2017 12:16 AM

कल्याण-भिवंडी मार्गालगत असलेल्या कोन गावातील एका मशीदीवर कारवाई करण्यासाठी एमएमआरडीएचे पथक मंगळवारी पोहचले तेव्हा या कारवाईस हिंदू बांधवांनी विरोध केला

कल्याण : कल्याण-भिवंडी मार्गालगत असलेल्या कोन गावातील एका मशीदीवर कारवाई करण्यासाठी एमएमआरडीएचे पथक मंगळवारी पोहचले तेव्हा या कारवाईस हिंदू बांधवांनी विरोध केला. मशीदीवर कारवाई केल्यास ‘आम्ही मंदीर तोडू आणि ते एमएमआरडीएने तोडल्याचे सांगू,’ असा पावित्रा हिंदू ग्रामस्थांनी घेतल्याने एमएमआरडीएला कारवाई न करताच हात हालवत माघारी फिरावे लागले. त्यानंतर मुस्लिमांनी मशीद तोडण्यास विरोध करणाऱ्या हिंदूंचा जाहीर सत्कार केला व आभार मानले. हिंदू मुस्लिम भाईचारा ग्रामीण भागात कसा घट्ट आहे, त्याचे उदाहरण पाहावयास मिळाले. कोन गावातील खाडी किनारी तडीपार भागात तकवा नावाची मशीद आहे. ही मशीद २००३ मध्ये बांधण्यात आली. भिवंडी महापालिका व महापालिका नजीकची भिवंडी तालुक्यातील अनेक गावे ही एमएमआरडीए नियोजन प्राधिकरणाच्या अंतर्गत येतात. ही मशीद पाडण्यासाठी एमएमआरडीएने ७ एप्रिल रोजी नोटीस दिली होती. मशीद पाडण्यासाठी एमएमआरडीएचे अधिकारी मंगळवारी पथकासह कोन गावात पोहचले. ५०० पोलीस, दोन जेसीबी आणि एक पोकलेन असा फौजफाट घेऊन पथक मशीदीपाशी पोहचले. त्यावेळी गावातील हिंदू बांधवांनी कारवाईस मज्जाव केला. पथकाने मशीदवर हातोडा चालविल्यास आम्ही स्वत: गावातील मंदिर पाडू आणि हे मंदिर एमएमआरडीएने पाडल्याचे सांगू असा दम भरला. हिंदूंचा हा पावित्रा पाहून पथकाला चांगलाच घाम फुटला. त्यामुळे ते पथक माघारी परतले.कल्याणमधील मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते शरफूद्दीन कर्ते, नगरसेवक काशीब तानकी, मशीदचे प्रमुख रईस खान मोकाशी, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी फरदीन करेल यांनी कोन गावच्या सरपंच डॉ. रुपाली अमोल, उपसरपंच महेंद्र नाईक, विनोद म्हात्रे, डॉ. अमोल कराळे यांच्यासह अन्य हिंदू बांधवांचा ग्रामपंचायत कार्यालयात सत्कार केला. यावेळी मुस्लिम बांधव हिंदूंनी घेतलेल्या पुढाकाराने भारावले होते. (प्रतिनिधी)