शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
2
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
3
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
4
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
5
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
6
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
7
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
8
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
9
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा
10
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
11
महायुतीमधील वाद विकोपाला गेले तर बसेल फटका; मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, ठाणे मतदारसंघात अंतर्गत धुसफूस
12
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
13
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
14
ऋता आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा; व्हायरल व्हिडीओवरून परांजपे यांची मागणी
15
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
16
ठाणे, वसईत २० लाखांत घर; म्हाडाच्या कोकण मंडळाचा ‘धमाका’
17
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
18
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
19
उद्योगपती मंदाना यांची १७० कोटींची मालमत्ता जप्त; बँक ऑफ बडोदाची फसवणूक केल्याचा ठपका
20
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली

उत्तनचा कचरा पुन्हा पेटण्याची चिन्हे

By admin | Published: March 02, 2016 1:49 AM

भार्इंदरच्या उत्तन धावगी येथे बेकायदा सुरू असलेल्या डम्पिंगविरुद्ध आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा पवित्रा डोंगरी येथील ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला

मीरा रोड : भार्इंदरच्या उत्तन धावगी येथे बेकायदा सुरू असलेल्या डम्पिंगविरुद्ध आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा पवित्रा डोंगरी येथील ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला. या प्रश्नावर पालिकेची नेमकी भूमिका समजून घेण्यासाठी आयुक्तांची भेटही घेतली जाणार आहे. मात्र ग्रामस्थांच्या पवित्र्यामुळे बेकायदा डम्पिंंगचा प्रश्न पेटण्याची चिन्हे आहेत. धावगीच्या डोंगरावर शासनाने घनकचरा प्रकल्पासाठी दिलेल्या जागेत प्रकल्प उभारण्यासाठी पालिकेने २००७ साली हेंजर बायोटेक या ठेकेदार कंपनीला परवानगी दिली होती. परंतु ती प्रक्रिया नेमकेपणाने करता न आल्याने कचऱ्याची प्रचंड दुर्गंधी पसरली. परिणामी, २०१० मध्ये ग्रामस्थांनी मोठे आंदोलन उभारले होते. त्याला हिंसक वळण लागले. त्या वेळी वरसावे येथे प्रकल्प सुरु करू, असे आश्वासन पालिकेने दिल्याने पुन्हा तात्पुरत्या स्वरूपात उत्तनचा कचरा प्रकल्प सुरु झाला. प्रत्यक्षात प्रकल्प अपयशी ठरला. परिसरात दुर्गंधी, दुषित पाणी आणि आग लागून प्रदूषण होतच होते. अडीच वर्षापासून प्रकल्पच बंद पडल्याने दररोज सुमारे े४०० टन कचरा येथे प्रक्रि या न करताच टाकला जात आहे . त्यामुळे येथील नागरी संघर्ष समितीने गेल्या वर्षी मे मध्ये हरित लवादाकडे याचिका दाखल केली. तेव्हा पालिकेने सकवार येथे १८ महिन्यात प्रकल्प सुरु होणार असून त्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगितले होते. लवादाने मात्र एस्क्रो खाते काढून त्यात ७० कोटी भरण्यास सांगितल्याने पालिकेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन लवादाचे आदेश रद्द करून घेतले. तेथेही सकवार येथे प्रकल्प सुरु करणार असल्याचे आश्वासन पालिकेने दिले होते. दरम्यान, उत्तन येथे साचलेल्या आणि दररोज नव्याने येणार्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेला आयआयटीचे मार्गदर्शन घेण्यासही न्यायालयाने सांगितले. त्याला दहा महिने उलटले, पण सकवार येथील प्रकल्प उभारणी दृष्टीपथात नाही. तेथील जमीनही पालिकेच्या नावे नाही. वन खात्याची परवानगी नाही. कचऱ्याचे मोठमोठे डोंगर तयार झाले असून रहिवाशी त्रस्त आहेत. ही वस्तुस्थिती सर्वांपुढे यावी आणि पुढे काय भूमिका घ्यायची, हे ठरविण्यासाठी रविवारी डोंगरी येथे बैठक झाली. तिला नगरसेवक बर्नड डिमेलो, माजी नगरसेवक लिओ कोलासो, हेरल बोर्जीस, जेम्स कोलासो यांच्यासह रेनॉल्ड बेचरी, विद्याधर रेवणकर तसेच चौक, पाली, उत्तन, डोंगरी गावचे पाटील आणि गाव समितीचे सदस्य उपस्थित होते.