डोंबिवली : सायकलने आरोग्याची गुरु किल्ली दिली आहे . याच सायकलच्या माध्यमातून पर्यावरणाचा प्रचार आणि प्रसार करणे ही काळची गरज आहे, असे प्रतिपादन बंदरे व विकास, आरोग्य शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीतील पहिल्यावहिल्या सायकल मित्र संमेलनात केले.येथील सावित्रीबाई फुले कलामंदिरात हे संमेलन पार पडले. डोंबिवली सायकल क्लब, क्रीडाभारती, नॅशनल युथ आॅर्गनायझेशन आणि वाहतूक पोलिसांनी भरवलेल्या आणि चार सत्रात पार पडलेल्या या एक दिवसीय संमेलनाचे उद््घाटन चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.पहिल्या सत्रात झालेल्या उद्घाटनप्रसंगी क्र ीडाभारती संस्थेचे महामंत्री राज चौधरी, संमेलनाचे आयोजक कमलाकर क्षीरसागर, पद्यनाभ गोखले, ऋ षीकेश यादव, डॉ. सुनील पुणतांबेकर उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, स्मार्ट सिटी उपक्रमात कल्याणला सध्या विशेष महत्त्व दिले गेले आहे. परंतु पुणे शहरात ज्याप्रमाणे सायकल आराखडा बनविला गेला, त्याधर्तीवर डोंबिवलीतही सायकलस्वारांसाठी विशेष आराखडा तयार केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.डोंबिवली शहराने दरवेळी नवीन उपक्र माचा पायंडा पाडला आहे. पहिले सायकल मित्र संमेलन हा त्याचाच एक भाग आहे, असे चव्हाण म्हणाले. अशी सायकल संमेलने जिल्हा स्तरावर झाली पाहिजेत. सायकल हा आनंद देणारा व्यायाम आहे. सायकल ही पर्यावरणाची गरज असून तिचा मोठ्या प्रमाणात वापर व्हावा, असे आवाहन क्र ीडाभारतीचे महामंत्री राज चौधरी यांनी केले. मुंबईत ज्याप्रमाणे दरवर्षी दुर्गमित्र संमेलन आयोजित केले जाते . त्याचप्रमाणे डोंबिवलीत प्रतिवर्षी सायकलमित्र संमेलन होईल, असे आयोजक कमलाकर क्षीरसागर यांनी सांगितले.याआधी सायकल रॅली, स्पर्धा आपल्याला माहित होती. तसेच सायकलचे स्टंट टिव्ही शोच्या माध्यमातून पाहावयास मिळाले. परंतु राज्यभरातील सायकलपटूंना एकत्र आणून समन्यवाची चळवळ तसेच यंत्रणा उभी राहावी, यासाठी हे संमेलन भरविण्यात आल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. स्मार्ट सिटीअंतर्गत सायकलस्वारांसाठी शहरात सायकल ट्रॅक असावा, तसेच स्मार्ट सिटीच्या प्रक्रि येत सायकलप्रेमी आणि सायकल क्लब यांना सामावून घ्यावे. सायकल ट्रॅकची उभारणी झाल्यानंतर अन्य वाहनांचे त्यावर अतिक्रमण होणार नाही, याचीही खबरदारी घेतली जावी अशी अपेक्षा क्षीरसागर यांनी व्यक्त केली. यावेळी चव्हाण यांच्या हस्ते सायकल स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. संमेलनाचे सूत्रसंचालन लीना ओक-मॅथ्यू यांनी केले.या संमेलनानिमित्त रविवारी सकाळी सायकल रॅलीही काढण्यात आली. त्याला लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यात अनेक वेगळ््या आणि अनोख्या सायकली डोंबिवलीकरांना पाहायला मिळाल्या. त्यासाठी ८० वर्षाचे ज्येष्ठ सायकालिस्ट गोविंद परांजपे सांगलीहून आले, ७६ वर्षाचे श्यामसुंदर केसरकर हे ठाण्याहून आले. शहरातील पाच ठिकाणांहून ७०० सायकलस्वार यात सहभागी झाले होते. पुणे, पनवेल, धुळे, नाशिक, बुलढाणा आदी भागातून सायकलपटूंनी यात सहभाग नोंदवला.चित्र प्रदर्शनातून आरोग्याचा कानमंत्र देण्यात आला. ‘सायकल पळवा, आरोग्य मिळवा,’ ‘सायकल चालवून आरोग्य होई सशक्त, स्वच्छ हवेसाठी करूया निसर्ग प्रदूषणमुक्त,’ ‘प्लीज युज सायकल (पीयुसी)’ असे संदेश प्रदर्शनातून देण्यात आले. प्रदर्शनाच्या ठिकाणी सिंगल, दोन-तीन सीट अशा विविध प्रकारच्या सायकली पाहण्यासाठी ठेवण्यात आल्या होत्या.‘त्या’ सायकलपटूंचा विशेष सत्कारसंमेलनाला राज्यातील विविध सायकल क्लबचे प्रतिनिधी आणी विक्र मवीर सायकलपटूंनी मोठया संख्येने हजेरी लावली.ज्येष्ठ सायकलपटू ९० वर्षीय डी. व्ही. भाटे, ८० वर्षीय गोविंद परांजपे यांच्यासह सुनिल ननावरे, संजय मयुरे आणि कृत्रिम पायांच्या साह्याने विक्रमी सायकल मोहीम पार पाडणारे सुशील शिंपी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.मार्गदर्शन आणि अनुभवकथनसायकलसंबंधी विविध उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. अनुभवांची देवाण-घेवाण, ज्यांनी काही खास घडविले आहे अशा व्यक्त ी आणि क्लब यांचे कौतुक करण्यात आले. सायकल चालविताना आरोग्य आणि सुरक्षा कशी राखावी, आदी विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले. अंध सायकलपटूंचा व त्यांचे प्रशिक्षक राजेश शुक्ला यांचा सत्कार करण्यात आला.केळकर, डावखरे, दामले यांची उपस्थितीसंमेलनादरम्यान ठाण्याचे आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे आणि कल्याण-डोंबिवलीचे स्थायी समिती सभापती राहुल दामले यांनीही उपस्थिती लावली. पहिल्या संमेलनाबाबत डोंबिवलीकरांचे कौतुक करीत पुढील संमेलन हे ठाण्यात व्हावे, अशी इच्छा केळकर आणि डावखरे यांनी व्यक्त केली. दिल्लीसारखी शहरे प्रदुषणाच्या विळख्यात सापडली आहेत. कल्याण-डोंबिवलीलाही प्रदुषणाचा त्रास आहे. त्यामुळे अशी संमेलने गरजेची आहे. यातून प्रदुषण कमी होण्यास मदत होईल. सायकल मित्र संमेलन ही एक चळवळ असून या माध्यमातून काही उपक्रम सुचविले, तर शासनाकडे पाठपुरावा करून सहकार्य करू, असे केळकर म्हणाले; तर दामले यांनी यंदाच्या कल्याण-डोंबिवलीच्या अर्थसंकल्पात शहरात सायकल ट्रॅक उभारण्यासाठी विशेष आर्थिक तरतूद केली जाईल, अशी ग्वाही दिली.
सायकलप्रेमींनी डोंबिवलीला दिली अनोखी गती , पहिल्या संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 7:07 AM