पालघर : डहाणू आणि तलासरी तालुक्याच्या काही भागात मागील काही दिवसांपासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तसेच पुढील उपाय योजण्यासाठी तज्ज्ञांचे पथक पाठविण्याबाबत लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाने शासनाकडे विनंतीनुसार मंगळवारी पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे. त्यांच्यामार्फत भूकंपग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर आज सासवंद येथील वेदांत हॉस्पिटल परिसरात सिसमोमीटर (भूकंप मापन यंत्र) बसविण्यात आले असल्याची माहिती डहाणूचे तहसीलदार राहूल सारंग यांनी दिली.यावेळी तलासरीचे आमदार पास्कल धनारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेकानंद कदम उपस्थित होते. या मशीनद्वारे भूगर्भातील हालचाली रिअल टाइम रीड करून त्याचा अहवाल मिळण्यास आणि भूकंपाच्या हालचालीचा शोध घेण्यास त्याची मदत होणार आहे.दिल्लीहून आले तज्ज्ञदिल्ली येथील भूगर्भ तज्ज्ञ कमलेश चौधरी आणि मुंबई येथील त्यांचे सहायक किरण नारखेडे यांचे पथक डहाणू व तलासरी तालुक्यातील काही भागाची तपाणी करीत आहेत. यावेळी शासनाच्या विविध अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून माहिती घेतली.
तज्ज्ञांनी सासवंद भागात बसविले सेस्मोमीटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 10:39 PM