शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
3
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
4
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
5
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
7
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
8
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
9
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
10
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
11
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
12
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
13
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
14
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
15
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
16
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
17
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
18
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
19
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
20
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम

माहिती अधिकारात उघड, तीन उड्डाणपूल धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 4:37 AM

भिवंडी- कल्याण- शीळ या प्रचंड वाहतुकीच्या रस्त्यावरील तीन पूल धोकादायक बनले असून त्यातील काटईचा पूल दुरूस्तीपलिकडे गेलेला असतानाही त्यावरून बिनधास्त अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्याने कल्याण-डोंबिवलीकरांचा प्रवास संकटात सापडला आहे.

मुरलीधर भवार कल्याण : भिवंडी- कल्याण- शीळ या प्रचंड वाहतुकीच्या रस्त्यावरील तीन पूल धोकादायक बनले असून त्यातील काटईचा पूल दुरूस्तीपलिकडे गेलेला असतानाही त्यावरून बिनधास्त अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्याने कल्याण-डोंबिवलीकरांचा प्रवास संकटात सापडला आहे. माहिती अधिकाराचे कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी ही बाब उघडकीस आणली आहे.या २१ किलोमीटर अंतराच्या रस्त्यावरील देसाई खाडी पूल, काटईतील रेल्वेवरील पूल आणि पत्री पूल हे धोकादायक बनल्याचा अहवाल राज्य रस्ते विकास महामंडळाने कल्याण वाहतूक नियंत्रण शाखेच्या सहाय्यक पोलिस आयुक्तांना ३ आॅगस्टला दिला आहे. काटईचा पूल तर दुरुस्ती करण्यापलिकडचा आहे, असे स्पष्ट झाल्यानंतरही तो डागडुजी करून वापरात आहे. या पुलावरून जड आणि अवजड वाहनांची वाहतूक करणे धोकादायक असल्याचा अहवाल देण्यात आल्यानंतरही ती वाहतूक बिनदिक्कत सुरु आहे.भिवंडी-कल्याण-शीळ हा रस्ता मुंबई-पुणे, मुंबई-गोवा, मुंबई-नाशिक महामार्गाला जोडणारा दुवा असल्याने त्यावर वाहतुकीचा प्रचंड भार आहे. या रस्त्यालगत भिवंडी, कोन, कल्याण, डोंबिवली, शीळ परिसरात नवनवी गृहसंकुले उभी राहत असल्याने वाहतुकीचा ताण सतत वाढतो आहे.या रस्त्यावर देसाई गावाजवळ खाडीवरील उड्डाणपूल दुपदरी आहे. तोही कमकुवत आहे. तेथील आधीचा पूल पडल्यानंतर हा नवा पूल उभारण्यात आला होता. तो बांधतानाच दुपदरी न बांधता चौपदरी बांधावा अशी मागणी झाली होती. पण ती अव्हेरल्याने पुन्हा पूल बांदण्याची वेळ येणार आहे. दिवा-पनवेल मार्गावर काटईचा उड्डाणपूल आहे. रेल्वेने १९६२ मध्ये तो उभारला. पुलाचे आयुर्मान संपल्याने त्याची दुरुस्ती शक्य नसल्याचे राज्य रस्ते विकास महामंडळाने रेल्वेला १ आॅगस्ट २०१५ ला कळवले. त्यानंतर रेल्वेने त्याची दुरूस्ती केली. त्यानंतरही तो जड व अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. सध्या त्यावरून शीळच्या दिशेची वाहतूक होते. त्या शेजारचा पूलही पुरेसा रूंद बांधण्यात आलेला नाही.ब्रिटिशांच्या काळात कल्याणला उभारलेला पत्री पूलही जड आणि अवजड वाहतुकीसाठी धोकादायक आहे. शीळ, डोंबिवलीहून कल्याणकडे येणारी वाहतूक या पुलावरून होते.या तिन्ही पुलांची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती करण्यासाठी रस्ते विकास महामंडळाने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. पण सरकारकडून त्याला मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे सरकार अपघात होण्याची वाट पाहात असल्याची टीका माहिती अधिकाराचे कार्यकर्ते घाणेकर यांनी केली आणि तिन्ही पूल नव्याने बांधून होईपर्यंत त्यावरील जड व अवजड वाहतूक तत्काळ बंद करण्याची मागणी त्यांनी केली.