ठाणे : चांद्रयान २ मोहीम व इस्रोची कामगिरी यावर मार्गदर्शन करताना मोहीमेत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या सुरेंद्र वैद्य यांनी आपल्या ओघवत्या शैलीत इस्रोचा गौरवशाली इतिहास, कमीतकमी संसाधनाद्वारे केलेल्या अतुलनीय संशोधनाचा चढता आलेख, ४ टन ते ४००० टन पेलोड वाहून नेणाºया रॉकेट लॉंन्चर्सचे निर्माण, एकावेळेस १०४ उपग्रह सोडण्याचा विक्र म, चांद्रयान २ चे निर्माणापासून ते प्रक्षेपणापर्यंतचा प्रवास अतिशय रंजकरीत्या वर्णन केला.
दिनदयाळ प्रेरणा केंद्र, ठाणेतर्फे रविवारी सीकेपी हॉल येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्र माच्या सुरु वातीला संस्थेचे कार्यवाह मकरंद मुळे यांचे वडील व रास्वसंघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक सुधाकर दत्तात्रेय मुळे, योगाचार्य अण्णा उर्फ श्रीकृष्ण वासुदेव व्यवहारे, भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज तसेच भारताचे माजी अर्थ व संरक्षणमंत्री अरु ण जेटली यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सीए संजीव ब्रम्हे यांनी दिनदयाळ प्रेरणा केंद्रने ‘चांद्रयान २’ यांवर व्याख्यान आयोजित करण्यामागची भूमिका विषद केली. विनय नाईक यांनी विद्यार्थी वर्गासाठी विज्ञानभारती करीत असलेल्या विविध उपक्र मांची माहिती दिली.ठाण्यातील विद्यार्थ्यांचा सत्कार : दरम्यान, चीन येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय विज्ञानप्रकल्प स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाºया ठाणे शहरातील विद्यार्थिनी रमा राईलकर, अवनी साठे, प्रज्ञा मोरे, रेवारे यांचा वैद्य यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या मोहिमेत महत्त्वाचे योगदान देऊन ठाणे शहराची मान उंचावणारी अभिमानास्पद कामगिरी करणारे वैद्य, आनंद शेवडे व मिहीर घोटीकर यांचा डॉ. किरण ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या व्याख्यानानंतर वैद्य यांनी प्रेक्षकांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.पुतळ्यांऐवजी विज्ञानाधारित प्रकल्प उभारा : कार्यक्र माचे अध्यक्ष ठाकूर यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी विज्ञान या विषयाकडे लक्ष देण्यास सांगितले तसेच शहरात चौकाचौकात पुतळे उभारण्याऐवजी विज्ञानाधारित प्रकल्प उभारण्याची सूचना केली. संस्थेचे सदस्य भरत अनिखिंडी यांनी ओळखा पाहूची उत्तरे सांगून तीन विजेते घोषित केले. कार्यक्र माचे निवेदन सीए कल्पना राईलकर यांनी केले. निशिकांत महांकाळ यांनी केलेल्या आभार प्रदर्शन केले.