शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

विस्तारित ठाण्याला रेल्वेच्या अटींचा खोडा

By admin | Updated: June 4, 2016 01:36 IST

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ठाणे-मुलुंडदरम्यान मेंटल हॉस्पिटलच्या जागेवरील नवीन विस्तारित रेल्वे स्थानकाला मध्य रेल्वेने मंजुरी दिली असल्याची माहिती महाव्यवस्थापक

ठाणे : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ठाणे-मुलुंडदरम्यान मेंटल हॉस्पिटलच्या जागेवरील नवीन विस्तारित रेल्वे स्थानकाला मध्य रेल्वेने मंजुरी दिली असल्याची माहिती महाव्यवस्थापक एस.के. सूद यांनी खासदार राजन विचारे यांना पत्राद्वारे कळवली आहे. पण खर्चाचा, पुनर्वसनाचा मुद्दा रेल्वेने आपल्या अंगावर न घेतल्याने प्रकल्पातील तो खोडा कायम आहे.विचारे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्याने नवीन रेल्वे स्थानकाची निर्मिती करण्याची मागणी केली होती. त्यावर, प्रभू यांनी नोडल आॅफिसर म्हणून मुख्य प्रशासकीय अधिकारी एम.के. गुप्ता यांची नियुक्ती करून त्यांना अहवाल देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, गेल्या आठवड्यात ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल व रेल्वेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी एम.के. गुप्ता यांच्यात बैठक झाली. त्यात बालाजी रेल रोड सिस्टीम लि. या सल्लागार संस्थेने केलेला आराखडा सादर करण्यात आला. हा प्रकल्प संयुक्तपणे राबवण्यास उभयतांनी सहमती दर्शवली. सूद यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, एमएमआरव्हीसीच्या सर्वेक्षणानुसार ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज ६ लाख ५० हजार प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे रेल्वे स्थानकाची निर्मिती करण्यासाठी महापालिकेने सादर केलेल्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. (प्रतिनिधी)