शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
3
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
4
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
5
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
6
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
7
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
8
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
9
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
10
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
12
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
13
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
14
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
15
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
16
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
17
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
18
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
19
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
20
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी

फेसबुकवर मुलीचं बनावट खातं उघडून तिच्या मैत्रिणींना अश्लील फोटो, क्लिप पाठवणा-या आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2018 9:58 PM

मुलीच्या नावे बनावट फेसबुक खाते उघडून तिच्या मैत्रिणींचा मोबाईल नंबर घेऊन ६ जणींना अश्लील फोटो आदी पाठवणारा आरोपी मंगेश इश्वरदास तांबे (२२) ह्याला उत्तन सागरी पोलीसांनी अहमदनगरच्या राहुरीतील तांबेरे येथून अटक केली आहे.

मीरा रोड - मुलीच्या नावे बनावट फेसबुक खाते उघडून तिच्या मैत्रिणींचा मोबाईल नंबर घेऊन ६ जणींना अश्लील फोटो आदी पाठवणारा आरोपी मंगेश इश्वरदास तांबे (२२) ह्याला उत्तन सागरी पोलीसांनी अहमदनगरच्या राहुरीतील तांबेरे येथून अटक केली आहे.उत्तन भागातील एका १५ वर्षीय मुलीच्या पालकांकडे अन्य ५ मुलीचे पालक येऊन तुमची मुलगी आमच्या मुलींना फेसबुक, व्हॉट्सएपवर अश्लील मॅसेज, फोटो व क्लिप पाठवत असल्याच्या तक्रारी केल्या. त्यामुळे त्या १५ वर्षीय मुलीच्या पालकांना देखील धक्का बसला. पण आपल्या मुलीने असं काही केलंच नसल्याचे व ते फेसबुक खातं देखील तिचं नसल्याची खात्री झाल्यावर १६ मार्च रोजी मुलींसह पालकांनी उत्तन सागरी पोलीस ठाणे गाठले.सहाय्यक अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रवीणकुमार साळुंखे यांनी या प्रकरणी तक्रारीवरून बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण तसेच भादंवि व आयटी कायद्यातील कलमांखाली गुन्हा दाखल केला व पुढील तपास सुरू केला. तपासात पोलिसांना आरोपीची ओळख पटताच उपनिरीक्षक जगदीश बांगरसह किरण ठाकूर, दिनेश आहेर यांनी आरोपी तांबे याला अहमदनगर येथे जाऊन अटक केली. मंगेशला उद्या २६ मार्च पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. या प्रकरणी पुढिल तपास भार्इंदरचे निरीक्षक राजेंद्र कांबळे करत आहेत.मंगेस हा वीटभट्टीवर काम करणारा ९ वी शिकलेला तरुण आहे. त्याने फेसबुक वरुन पिडीत मुलीशी मैत्री केली. नंतर तीचं बनावट खातं उघडुन तीच्या मैत्रीणींशी मॅसेंजर द्वारे चॅटींग करुन त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक मिळवले. मंगेश हा पिडीत मुलीच्या नावाने सदर मुलींना अश्लील फोटो, क्लीप व संदेश पाठवु लागला. पोलीसांनी त्याचा मोबाईल जप्त केला असुन तो फॉरेन्सीक लॅब कडे तपासणी साठी पाठवला आहे.