कल्याण : प्रलंबित मागण्यांसाठी दिव्यांगसेनेच्या वतीने जागतिक दिव्यांगदिनी सोमवारी निदर्शने करण्यात आली. रेल्वेस्थानकाजवळ असलेल्या टपाल कार्यालयाबाहेर केलेल्या या आंदोलनात युती सरकारचा निषेध म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टपालाद्वारे बांगड्यांचा आहेर पाठवण्यात आला.राज्यात दिव्यांगांची संख्या मोठी आहे. दिव्यांगांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून त्या सोडवण्यासाठी सरकारदरबारी वारंवार विनंती तसेच पत्रव्यवहार करण्यात आले आहेत. प्रलंबित मागण्या मान्य होत नाहीच, पण त्याची साधी दखलही घेतली जात नसल्याने आंदोलन छेडण्याची वेळ दिव्यांगांवर आल्याकडे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज सातोसे यांनी लक्ष वेधले.बहुतांश महापालिकांमध्ये युतीची सत्ता असूनही दिव्यांगांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष सुरू असल्याने पहिल्या टप्प्यात म्हणून दिव्यांगसेनेतर्फे‘मातोश्री’वर मोर्चा काढला होता. त्यानंतरही काहीच न झाल्याने पुन्हा सरकारला जागे करण्यासाठी सोमवारी जागतिक दिव्यांगदिनी आंदोलन केले होते, असे जिल्हा सरचिटणीस रेहान कुरेशीयांनी दिली.>काय आहेत मागण्या?दिव्यांगांना स्टॉल, बेरोजगार भत्ता, मोफत घरकुल योजना, मोफत वैद्यकीय सुविधा, बसडेपोमध्ये चहाची मशीन, रसाचे आणि पेपर स्टॉल.महापालिका शाळांमध्ये दिव्यांग कौशल्य विकास केंद्र सुरू करणे आदी मागण्यांसाठी दिव्यांगसेना पाठपुरावाकरत आहे.
फडणवीस, ठाकरेंना बांगड्यांचा आहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 12:39 AM