कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघ नव्याने अस्तित्वात आल्यापासून २००९ आणि २०१४ अशा दोन निवडणुका पार पडल्या. २००९ मध्ये ‘नोटा’चा अधिकार नव्हता. पण, २०१४ पासून तो लागू झाला. मागील निवडणुकीत एकूण १८ उमेदवार रिंगणात होते. यात सात अपक्षांसह सहा छोट्या पक्षांचे उमेदवार होते. त्यावेळी एकूण मतदान आठ लाख २४ हजार १९६ इतके झाले होते. यात ‘नोटा’चा वापर करणाऱ्यांची संख्या नऊ हजार १८५ इतकी होती. सात अपक्षांना मिळालेली एकूण मते १० हजार ६९५ असली तरी एकाही अपक्ष उमेदवाराला ‘नोटा’ला जेवढी मते मिळाली, त्याच्याजवळही पोहोचता आलेले नाही. तीच अवस्था सहा छोट्या राजकीय पक्षांची असून त्यांना एकूण १० हजार ९७२ मते मिळाली होती. या उमेदवारांना पडलेली वैयक्तिक मते पाहता हा आकडा चार हजार मतांच्यादेखील जवळ नसल्याचे स्पष्ट होते. यंदा काय स्थिती असेल, हे निकालाच्या दिवशी समोर येईल.>नोटा म्हणजे काय?ठडळअ म्हणजे ठङ्मल्ली डा ळँी अुङ्म५ी (यापैकी कुणीही नाही). जर ईव्हीएम मशीनवर असलेला उमेदवार तुम्हाला पसंत नसेल, तर नोटाला मत देऊ शकता. त्यासाठी सर्वांत खाली एक बटण असते. ते दाबले तर वरीलपैकी कोणत्याच उमेदवाराला ते मत मिळत नाही.>६,३१,०३५मते दोन प्रमुख उमेदवारांना गेल्या निवडणुकीत मिळाली होती. शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यांना ४,४०,८९२ तर राष्टÑवादीचे आनंद परांजपे यांना १,९०,१४३ मते मिळाली होती.>उमेदवार पक्ष मते। अनिल मोरे बीएमपी ३,५३१ । मोहम्मद सय्यद सप ३,०४७। श्यामू भोसले बीबीएम १,८६९। मिलिंद बेळमकर लोकभारती ५४०। सुलोचना सोनकांबळे रि.बहुजनसेना १,२२९। सुधाकर शिंदे एपीआय ७२६। शशिकांत रसाळ अपक्ष २,०९६। नोटा नोटा ९,१८५
कल्याणमध्ये नोटापेक्षा अपक्षांना मिळाली कमी मते
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 1:53 AM