लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : सदनिकेची रक्कम देऊनही तिचा ताबा न देता ग्राहकाला सदोष सेवा देणाऱ्या आयोनिक रिअॅलिटी लिमिटेडसह अन्य दोन भागीदारांना जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने सुमारे ६० हजारांचा दंड सुनावला आहे.मीरा रोड येथील नीतू श्रीवास यांनी मेसर्स आयोनिक रिअॅलिटी यांच्या वसई येथील नियोजित प्रकल्पात ९ लाख ८५ हजार ५०० रुपयांना सदनिका घेण्याचे ठरले. नीतू यांनी मार्च २०११ मध्ये सदनिकेचे सव्वादोन लाख देऊन सदनिका बुकिंग केली. इमारतीचे बांधकाम २०१४ पर्यंत पूर्ण करून सदनिकेचा ताबा देण्याचे आयोनिक रिअॅलिटी लिमिटेडच्या वतीने मान्य केले होते. याबाबत, नीतू यांनी अनेकदा विचारणा करूनही त्यांना ताबा दिला नाही. इमारतीचे बांधकामही पूर्ण केले नाही. त्यामुळे नीतू यांनी बिल्डर्सविरोधात मंचाकडे तक्रार दाखल केली. मंचाची नोटीस मिळूनही त्यांनी कोणतीच बाजू मांडली नाही.कागदपत्रे, पुरावे यांची पडताळणी केली असता नीतू यांनी आयोनिक इको सिटीमध्ये सदनिका घेण्याचे निश्चित करून सव्वादोन लाख बिल्डर्सला दिले. त्याची पावती मंचात आहे. अॅलॉटमेंट लेटरमध्येही त्याचा उल्लेख आहे. यावरून आयोनिक रिअॅलिटीने नीतू यांच्याकडून पैसे घेऊन इमारतीचे बांधकाम केले नाही. सदनिकेचा ताबा दिला नाही किंवा पैसेही परत केले नाही. त्यामुळे त्यांनी सदोष सेवा दिली आहे, असे मंचाने स्पष्ट केले.
ग्राहकाला सदोष सेवा दिल्याचा फटका
By admin | Published: July 17, 2017 1:12 AM