शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
3
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
4
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
5
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
6
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
7
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
8
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
9
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
10
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
11
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
12
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
13
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
14
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
15
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
16
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
17
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
18
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
19
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
20
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक

प्रकल्प चालवण्यास अपयश, सर्वाेच्च न्यायालयाने फटकारूनही सुधारणा नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 2:31 AM

सरकारने उत्तन धावगी डोंगरावर मीरा-भार्इंदर पालिकेला घनकचरा प्रकल्पासाठी ३१.४६ हेक्टर जागा मोफत दिली.

- धीरज परब मीरा रोड : सरकारने उत्तन धावगी डोंगरावर मीरा-भार्इंदर पालिकेला घनकचरा प्रकल्पासाठी ३१.४६ हेक्टर जागा मोफत दिली. मात्र, लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हा प्रकल्प राबवण्यात पालिका अपयशी ठरली. केवळ निविदा व टक्केवारीतच त्यांना रस होता. त्यामुळे प्रकल्पच चालवला गेला नाही.११ वर्षांत येथे शहरातील रोजचा कचरा बेकायदा टाकल्याने कचऱ्याचे डोंगर उभे राहिले. डम्पिंगची समस्या गंभीर असून, आंदोलनाचे सावट आहे. घनकचरा हाताळणी व विल्हेवाटी बद्दलचे कायदे, नियम आदी सर्रास कचºयात टाकण्यात आले आहेत. हरित लवादा पासून सर्वोच्च न्यायालयाने फटकारूनही पालिकेला त्याची जराही लाज नाही.२००७ मध्ये पालिकेने हेंजर बायोटेक कंत्राटदारास घनकचरा प्रकल्प उभारण्याची परवानगी दिली. कचºयाच्या दुर्गंधीमुळे २०१० मध्ये ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले.त्यामुळे प्रकल्प वरसावे येथे स्थलांतरित करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना देण्यात आले. पण, प्रकल्प स्थलांतराला राजकीय विरोध झाला. पुढे सकवार, तळोजा, वसई-विरार आदी पर्यायही पुढे आले. पण प्रत्यक्षात काही झाले नाही. तर, कंत्राटदारनेही पळ काढला.मीरा-भार्इंदर शहरात दररोज ५०० टन कचरा गोळा होतो. मात्र, त्याचे ओला-सुका असे वर्गीकरण होत नाही. प्रकल्पामुळे परिसरात दुर्गंधी, दूषित पाणी, विषारी वायू व आगी लागत असल्याने प्रदूषण होत आहे. २००७ पासून येथे १० लाख मेट्रिक टन पेक्षा कचरा साचला आहे. कचरा उचलणे, कचरा व्यवस्थापन यासाठी १०० कोटींचा खर्च वर्षाला होत आहे.स्थानिकांच्या संघर्ष समितीने डम्पिंगविरोधात हरित लवादाकडे धाव घेतली. २०१५ मध्ये लवादाने पालिकेला प्रकल्पासाठी ७० कोटी भरण्याचे व सर्वच कचºयाची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प सुरू करण्याचे आदेशदिले. मात्र, पालिकेने उच्च न्यायालयात जाऊन या आदेशास स्थगिती मिळवली. त्यानंतर उच्च न्यायालयाने उडवून लावल्याने पालिका सर्वोच्च न्यायालयात गेले. तेथे शेवटी पालिकेला पाच कोटी रुपये प्रकल्पासाठी भरण्याचे आदेश झल्याने नाईलाजाने पालिकेला ते भरावे लागले.उच्च न्यायालयाने आयआयटीसोबत कचºयावर प्रक्रि या करण्यासाठी प्रकल्प उभारण्याचे आदेश दिले होते. पण पालिकेने कोणत्याच यंत्रणांचे निर्देश पाळले नाहीत. हरित लवादानेही बांधकाम बंदीची तंबी दिली होती.महापौर, आयुक्त आदींविरोधात नाईलाजाने का असेना प्रदूषण नियंत्रण मंडळाने फौजदारी दावा दाखल केला. पण आजही परिस्थिती सुधारलेली नाही. सध्या दिल्लीत हरित लवादाकडे हे प्रकरण सुरू आहे .>अर्थसंकल्पामध्ये आठ कोटींची तरतूदकचºयावर बायो मायनिंगचा उतारा काढण्यात आला. ८३ कोटी ८३ लाखांचा खर्च अपेक्षित असताना अर्थसंकल्पात आठ कोटींची तरतूद झाली.सध्याचा कंत्राटदार सुक्या कचºयावर प्रक्रि या करत असल्याचे सांगत असला तरी त्याच्यावर विश्वास कोणी ठेवत नाही. त्याने केवळ दीडशे टनचा प्रकल्प उभारला आहे. प्रत्यक्षात मात्र, हा सर्व दिखाऊपणाच असल्याचा आरोप स्थानिकांकडून होतआहे.

टॅग्स :mira roadमीरा रोड