शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

बनावट डेबिट, क्रेडिट कार्ड बनवून पैशांचा अपहार ; चौघांना अटक : तीन परदेशी नागरिकांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 1:29 AM

आरोपींमध्ये तीन परदेशी नागरिकांचा समावेश असून त्यांची कसून चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मीरा रोड : बोगस स्वाईप मशीनद्वारे ख-या क्रेडीट तसेच डेबिट कार्डाचे तपशील मिळवून बनावट कार्डद्वारे एटीएममधून पैशांचा अपहार करणा-या चौकडीला गुन्हे अन्वेषण विभागाच्या काशिमिरा शाखेच्या पथकाने २४ फेब्रुवारी रोजी मीरारोड येथून अटक केली आहे. आरोपींमध्ये तीन परदेशी नागरिकांचा समावेश असून त्यांची कसून चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.मीरा-भार्इंदर परिसरात काही दिवसांपासून ख-या वाटणा-या बोगस स्वाईप मशीनद्वारे ग्राहकांच्या क्रेडिट तसेच डेबिट कार्डच्या तपशीलानुसार बनावट डेबिट आणि क्रेडिट कार्ड बनवून ग्राहकांच्या खात्यातील रकमेचा अपहार होत असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाच्या काशिमिरा शाखेला मिळाली होती. त्याचा मागोवा घेण्यासाठी विभागाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे आणि शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक प्रमोद बडख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीकांत कारंडे यांच्या पथकाने मीरारोड येथील हॉटेल शुभम येथे २४ फेब्रुवारीला धाड टाकली. त्यावेळी या गोरखधंद्यात समावेश असलेल्या कमाल उस्मान खानसह रिचर्ड रोनाल्ड मागो (नायजेरिया), हिलरी स्थर केगन (केनिया) व सॅन्ड्रीक सॅम डांबा (युगांडा) या चौकडीला पथकाने अटक केली. तसेच त्यांच्याजवळील सुमारे २ लाखांची रोकड आणि लॅपटॉप पोलिसांनी ताब्यात घेतला.पोलिसांनी आरोपींची अधिक चौकशी केली असता ते बोगस स्वाईप मशिन काही दुकानदारांशी संगनमत करुन विक्रीच्या ठिकाणी ठेवत. दुकानदार, ग्राहकांना प्राधान्याने त्या मशीनद्वारे डेबिट किंवा क्रेडीट कार्ड स्वाईप करण्यास सांगत. ग्राहकांनी कार्ड स्वाईप केल्यानंतर खरेदी वा व्यवहाराची रक्कम आणि पिन टाईप केल्यानंतर त्या मशीनमध्ये तांत्रिक बिघाड (एरर) दाखविला जात असे. दरम्यान त्या स्वाईप मशिनमध्ये ग्राहकांच्या कार्डसह पिन क्रमांकाच्या तपशीलाची नोंद होत असे. त्याद्वारेच या रकमांचा अपहार होत होता.मोठ्या रॅकेटची शक्यता-हे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवून आरोपींनी मीरा-भार्इंदरसह वसई-विरार व नवी मुंबईतही असे प्रकार केल्याचे समोर आल्याचे कारंडे यांनी सांगितले. याप्रकरणी आरोपींवर मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाthaneठाणेArrestअटक