मीरा रोड - मीरा-भाईंदर पालिकेच्या वादग्रस्त ठरलेल्या काशीमीरा येथील बीएसयूपी योजनेत घर मिळवून देण्यासाठी बनावट रेशनकार्डसह अन्य बनावट पुरावे बनवून दिल्याप्रकरणी काशीमीरा पोलिसांनी -सरकारी रेशन दुकानदारासह अन्य दोघांना अटक केली आहे. तर आणखी दोन जण फरार झाले आहेत.
२२ जून रोजी दहिसर येथे राहणारे दयाराम भारती यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी हरिहर चौहान, मंगल मिठाईलाल गांधी, दयाशंकर राजदेव यादव, आशिष नशिना चौहान आणि अमृतलाल पाल याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी हरिहर, मंगल आणि दयाशंकर याना अटक केली असून, ठाणे न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. आशिष व अमृतलाल फरार झाले आहेत.
पडताळणीनंतर कागदपत्रे बोयस..• दयाराम यांना बीएसयूपी योजनेत फ्लॅट मिळवून देतो, असे सांगून आरोपींनी २०१५ मध्ये दयाराम यांच्या नावाने बनावट १९९९ सालचा हरिश्चंद्र कोठारीकडून घर खरेदीचा करारनामा व रेशनकार्ड बनवून दिले.● त्या बदल्यात दयाराम यांच्याकडून सात लाख रुपये घेण्यात आले. काही दिवसांनी आशिषने महापालिकेचा शिक्का असलेले बीएसयूपी योजनेचे झोपडपट्टीधारकांचे सर्वेक्षण गणना पत्रक दिले.• घराची मागणी करूनही आरोपी टाळाटाळ करत असल्याने दयाराम यांना संशय आला