शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
2
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
3
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
4
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
5
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी निस्तब्ध पडून राहिली नवी नवरी
6
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
7
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
8
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
9
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
10
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
11
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
12
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
13
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
14
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
15
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
16
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
17
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
18
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
19
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
20
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."

भाडेतत्त्वावरील वाहनांची परस्पर विक्री करणाऱ्या ठगाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 20:28 IST

जादा मोबदला देण्याचे अमिष दाखवित भाडेतत्वावर वाहने घेऊन नंतर तीच वाहने परस्पर परराज्यात विक्री करणाºया शेशोस्कर पुष्करण थंगील ऊर्फ अप्पू (३१) या ठकसेनाला कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्देठाण्याच्या कासारवडवली पोलिसांची कारवाईओळख लपवून केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात वास्तव्य१७ लाख ५० हजारांची चार वाहने जप्त

ठाणे : भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी घेतलेल्या वाहनांची परस्पर परराज्यांत विक्री करून मालकांची फसवणूक करणा-या शेशोस्कर पुष्करण थंगील ऊर्फ अप्पू (३१, रा. मीरा रोड, ठाणे) याला कासारवडवली पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. पोलीस कोठडीदरम्यान त्याच्याकडून १७ लाख ५० हजारांची चार वाहने हस्तगत केल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली.कासारवडवली, पातलीपाडा, घोडबंदर रोड, लक्ष्मी प्लाझा येथील रहिवासी रोहन कचरे यांच्या मालकीची कार भाडेतत्त्वावर लावण्यासाठी शेशोस्कर याने मे २०१८ मध्ये गळ घातली होती. एका कंपनीमध्ये त्यांची कार भाडेतत्त्वावर लावल्यास चांगला आर्थिक फायदा करून देण्याचे आमिषही त्याने दाखवले. त्यासाठी महिना १७ हजार ६६२ रुपयांप्रमाणे ३३ हप्ते देण्याचे ठरले. ही कार त्यांच्याकडून घेतल्यानंतर ठरलेला १७ हजार ६३२ रुपयांचा हप्ता मात्र त्याने भरलाच नाही. शिवाय, त्यांची कारही त्याने परत केली नाही. याप्रकरणी कचरे यांनी शेशोस्कर याच्याविरुद्ध १३ एप्रिल २०१९ रोजी कासारवडवली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. यातील आरोपी शेशोस्कर हा आपली ओळख लपवून केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या बाहेरील राज्यांमध्ये वास्तव्य करत असल्यामुळे तो ठाणे पोलिसांच्या हाती लागत नव्हता. तो ठाण्यात येणार असल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक एस.बी. जाधव यांच्या पथकाने १० एप्रिल रोजी ठाणे जिल्हा रुग्णालयासमोरील बसथांब्यांसमोर सापळा लावला होता. याच सापळ्यामध्ये शेशोस्कर याला अटक करण्यात आली. त्याला १९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मिळाली. याचदरम्यान चौकशीमध्ये त्याने मुंबई, ठाणे, मुंब्रा, मीरा रोड आणि वसई आदी परिसरांतील अनेक गरजू वाहनमालकांची वाहने भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी घेऊन ती आंध्र प्रदेश आणि केरळ राज्यांत विक्री केल्याचीही कबुली दिली. ही वाहने त्याने प्रत्येकी तीन ते चार लाखांमध्ये विकली होती. त्यानंतर, या संपूर्ण तपासासाठी एक स्वतंत्र पथक तयार करण्यात आले. या पथकाने आंध्र प्रदेशातील गुडीवाडा येथून कासारवडवली, मुंब्रा, मीरा रोड, नयानगर या पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातून चोरीस गेलेली प्रत्येकी एक अशा १७ लाख ५० हजारांची चार वाहने जप्त केली. त्याच्याकडून आणखीही अशाच प्रकारे वाहनचोरी आणि फसवणुकीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोणाचीही अशा प्रकारे वाहने भाडेतत्त्वावर घेतल्यानंतर फसवणूक झाली असल्यास संबंधितांनी कासारवडवली पोलिसांशी संपर्क साधावा. तसेच त्यांनी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी केले आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी