शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

महागात पडतोय ‘दुसरा’

By admin | Published: February 25, 2017 3:07 AM

ठाणे महापालिकेतील मतमोजणीचा तपशील हाती येऊ लागल्यानंतर या आकड्यांच्या खेळात शिवसेना आणि भाजपानेच परस्परांना तब्बल ९२ मतदारसंघात झुंजवल्याचे दिसून आले आहे

ठाणे : ठाणे महापालिकेतील मतमोजणीचा तपशील हाती येऊ लागल्यानंतर या आकड्यांच्या खेळात शिवसेना आणि भाजपानेच परस्परांना तब्बल ९२ मतदारसंघात झुंजवल्याचे दिसून आले आहे. निकालाच्या आकड्यांत भाजपा जरी तिसऱ्या स्थानवर फेकली गेली असली, तरी ५३ मतदारसंघांत दुसरे स्थान पटकावल्याने शिवसेनेला पुढील राजकीय वाटचालीत भाजपाची दखल घ्यावी लागणार आहे.शिवसेनेला ६७ जागांवर विजय मिळाला असला, तरी ३९ प्रभागांत तो पक्ष दुसऱ्या स्थानी असल्याने शिवसेनेच्या या विस्ताराचा विचार भाजपासह अन्य विरोधी पक्षांना करावा लागणार आहे.मुंब्रा-कळवा भागात भक्कम पकडे असलेला पक्ष अशी राष्ट्रवादीची ओळख असली आणि मागील निकालाशी तुलना करता त्यांनी त्यांचा दुसरा क्रमांक आणि संख्याबळ राखले असले तरी १६ ठिकाणी तो पक्ष दुसऱ्या स्थानासाठी झगडल्याचे स्पष्ट होते. अंतर्गत वादाचे ग्रहण असले तरी मुंब्रा परिसरात दोन जागा मिळवून राष्ट्रवादीला धक्का देणाऱ्या एमआयएमने मुंब्य्रातच तब्बल नऊ जागांवर निकराची झुंज देत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवल्याने राष्ट्रवादीसाठी ही धोक्याची घंटा मानली जाते. मोठी घसरगुंडी झालेली कॉंग्रेस केवळ सात जागांवर दुसऱ्या स्थानी आहे. मनसेला भोपळाही फोडता आला नसला, तरी तीन जागांवरत्यांनी चांगली लढत दिली आहे. (प्रतिनिधी)शिवसेनेचा विस्तार वाढलाठाण्यात स्वबळावर सत्ता हस्तगत करणाऱ्या सेनेने ६७ जागा मिळवल्या तरी तो पक्ष ३९ जागांवर दुसऱ्या क्रमांकावर आहे. यात प्रभाग २, ४, ६, ७, ११, १२, १५, २१, २२, २३, २४, २५, २९, आणि ३१ चा समावेश आहे.मनसेची छोटी झुंज ९९ जागांवर लढणाऱ्या मनसेला ठाणेकरांनी सपशेल नाकारले. त्यांच्या नवख्या उमेदवारांनी केवळ ३ जागांवरच दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविली. रिपाइं ऐक्यवादी गटाला आणि एका अपक्षाला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.