शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

थकबाकीदारांभोवती आवळला फास; केडीएमसीची धडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 12:09 AM

‘ब’ प्रभागातील सहा मालमत्तांचा केला लिलाव

कल्याण : मालमत्ताकराच्या वसुलीचे लक्ष्य गाठण्यासाठी केडीएमसी प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यासाठी थकबाकीदारांभोवती मालमत्ता लिलावाच्या कारवाईचा फास आवळण्यास सुरुवात केली आहे. ‘ब’ प्रभागातील सहा मालमत्तांच्या लिलावाची कारवाई महापालिकेने बुधवारी केली. या पार्श्वभूमीवर दोन मालमत्ताधारकांनी तातडीने तीन कोटी ७५ लाखांची थकबाकीची रक्कम धनादेशाद्वारे पालिकेकडे जमा केली. पालिकेच्या कारवाईचा बडगा लागू पडत असल्याने वसुलीचे लक्ष्य गाठले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.‘ब’ प्रभागातील सहा मालमत्ताधारकांनी २१ कोटींचा मालमत्ताकर थकवला आहे. महापालिकेने त्यांना नोटीस दिली होती. त्यानंतर, त्यांची मालमत्ता जप्त केली होती. त्या सहा मालमत्तांचा लिलाव बुधवारी करण्यात आला. या कारवाईमुळे दोन थकबाकीदारांनी पालिकेकडे धनादेश सुपूर्द केले. दोन मालमत्ताधारकांचे प्रकरण हे न्यायप्रविष्ट असल्याने त्यांनी कारवाईच्या स्थगितीसाठी न्यायालयातून स्थगिती आदेश आणला. तसेच अन्य एक मालमत्ता महापालिकेने एक रुपये लिलावात विकत घेतली आहे.२६ मार्चला मालमत्ताकर थकवणाऱ्यांविरोधात पुन्हा लिलावाची कारवाई करण्यात येणार आहे. ‘अ’ प्रभागातील ३२ मालमत्ताधारकांनी ३० कोटी ५५ लाखांचा कर थकवला आहे. त्याच्याविरोधात लिलावाची कारवाई केली जाणार आहे. ‘ह’ प्रभागातील नऊ मालमत्ताधारकांकडून एक कोटी ६१ लाख रुपये थकबाकी आहे. या नऊ मालमत्तांची किंमत जवळपास १५ कोटींच्या आसपास आहे. या नऊ मालमत्तांचा महापालिकेकडून लिलाव करण्यात येणार आहे. लिलावासाठी काढलेल्या मालमत्तांमध्ये बहुतांश बिल्डर असल्याचे दिसून येत आहे.महापालिकेने मालमत्ताकराचे लक्ष्य ३५० कोटींचे ठेवले आहे. त्यापैकी १२ मार्चपर्यंत महापालिकेच्या तिजोरीत मालमत्ताकराच्या वसुलीतून २८५ कोटी रुपये जमा झालेले आहेत. मालमत्ताकराच्या वसुलीची रक्कम वगळून महापालिकेच्या पाणीखात्याने पाणीपट्टीबिलाची वसुलीही केली आहे. त्यांच्या खात्यात १२ मार्चपर्यंत ५५ कोटी जमा झाले आहेत. पाणीपट्टीबिलाच्या वसुलीचे लक्ष्य ६० कोटींचे आहे. १५ दिवसांत पाणीखात्याला पाणीबिलाच्या वसुलीतून आणखी पाच कोटी वसूल करायचे आहेत. तर, मालमत्ताकर वसुली करणाऱ्या विभागास ६५ कोटी वसूल करायचे आहेत.निवडणुकीमुळे परिणाममहापालिकेच्या वसुलीवर लोकसभा निवडणुकीचा परिमाण होणार आहे. महापालिकेतून जवळपास ५०० कर्मचारी लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी घेण्यात आले आहेत.मालमत्ताकर वसुली व पाणीखात्यातील कर्मचारी निवडणुकीच्या कामकाजातून वगळण्यात यावेत, अशी विनंती महापालिका आयुक्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे. या मागणीचा विचार अद्याप निवडणूक यंत्रणेनेकेलेला नाही.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका