कुमार बडदेमुंब्रा : कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या तसेच रु ग्ण राहात असलेल्या परिसरात कर्तव्य बजावणाऱ्यांनादेखील त्याची लागण झाल्याचे आढळून आले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांच्या परिसरात कर्तव्य बजावत असलेल्या अनेक प्रशासकीय कर्मचाºयांच्या कुटुंबातील सदस्य कमालीच्या मानसिक दडपणाखाली वावरत आहेत. काही कर्मचा-यांच्या कुटुंबातील सदस्य तर थेट नोकरी गेली तरी चालेल,पण कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आलेल्या परिसरात कामाला जाऊ नका, असा सूचनावजा इशारा देत आहेत.कोरोनाबाधित बरे व्हावेत, यासाठी रुग्णालयांमध्ये डॉक्टर आणि त्यांचे पथक अथक प्रयत्न करीत आहेत. याचवेळी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनदेखील विविध प्रकारचे नियोजन करत आहे. या नियोजनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी हजारो अधिकारी, कर्मचारी दररोज रस्त्यावर उतरून त्यांचे कर्तव्य बजावत आहेत. यात वैद्यकीय कर्मचारी, पोलीस यंत्रणा, पाणीपुरवठा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, महावितरण, सफाई कामगार, बँक, दूरसंचार कंपन्यांचे कर्मचारी यांचा प्रामुख्याने समावेश आहे.अनेकांना जेथे कोरोनाबाधित रुग्ण आढळतो तेथील इमारती सील करणे, परिसर निर्जंतुकीकरण करण्यासाठी तसेच इतर कामांसाठी प्रत्यक्ष घटनास्थळीदेखील जावे लागते.सावधगिरी बाळगूनही अशा ठिकाणी गेलेल्या काही विभागातील अधिकारी, कर्मचाºयांना लागणझाली आहे. यामुळे या कर्मचाºयांच्या कुटुंबीयांमध्ये घबराट पसरली असून त्या भीतीतून ते या कर्मचाºयांना नोकरी सोडण्याचा सल्ला देत आहेत.>कर्तव्य बजावणारच; मागे हटणार नाही!कोरोनाबाधित परिसरात कर्तव्य बजावत असलेल्या अशा कर्मचाºयांच्या कुटुंबातील सदस्य मानसिक दडपणाखाली वावरत असून नोकरी गेली तरी चालेल. परंतु, वैयक्तिक आणि कुटुंबातील सदस्यांसाठी कोरोनाग्रस्त रु ग्ण आढळत असलेल्या ठिकाणी कर्तव्य बजावण्यासाठी न जाण्याची गळ कुटुंबातील सदस्य घालत असल्याची माहिती काही कर्मचाºयांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली. असे असले तरी सामाजिक जबाबदारी म्हणून कुटुंबातील सदस्यांचा रोष ओढवून जोपर्यंत कोरोना हद्दपार होत नाही, तोपर्यंत कर्तव्यात कसूर न करता कर्तव्य बजावणार असल्याचा निश्चय त्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला.
कोरोनाग्रस्त परिसरामध्ये लढणाऱ्या योद्ध्यांचे कुटुंबीय मानसिक दडपणात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 1:02 AM