शहरं
Join us  
Trending Stories
1
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
2
वैवाहीक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
3
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
4
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
5
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
6
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
8
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार
9
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
10
"त्याचा लहान भाऊ म्हणून...", छोटा पुढारीने सूरज चव्हाणबाबतीत दिला मोठा शब्द
11
महाराष्ट्रातील क्रीडारत्नांचा सन्मान! अविनाश साबळेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, प्रदीप गंधेंना 'जीवन गौरव'
12
इस्रायलचे गाझावर भीषण हवाई हल्ले; हमास प्रमुख रावी मुश्ताहा याच्यासह तीन टॉप कमांडर ठार
13
त्वेशा जैनने पटकावली दोन रौप्यपदकं! राज्य बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत केली चमकदार कामगिरी
14
"राहुल गांधींनी काँग्रेसमध्येही ड्रग्सचा धंदा सुरू केलाय का?"; अनुराग ठाकूर यांचा खोचक सवाल
15
Rohit Sharma लिलावात आल्यास RCB ने संधी सोडू नये; दिग्गजाचं मोठं विधान, हिटमॅनलाही सल्ला
16
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार!
17
“अक्षय शिंदेच्या बेड्या का काढल्या, फॉरेन्सिक रिपोर्टचे काय?”; हायकोर्टाचे प्रश्नांवर प्रश्न
18
Womens T20 World Cup 2024 : ती एकटी पडली; बांगलादेश संघाची विजयी सलामी!
19
“...तर ती देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीतील मोठी चूक असेल”; मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा
20
Womens T20 World Cup: 'ब्लॅक बेल्ट' आहे हिजाब घालून मैदानात उतरलेली ही महिला क्रिकेटर

गाईला वाचविण्यासाठी कुटुंबाने ओढली बैलगाडी! प्रेम पाहून, मुके मातृत्वही गहिवरले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 6:26 AM

गाेरक्षणाचा केवळ संदेश नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीही...

विशाल हळदे -ठाणे : गोमातेचे रक्षण करा, असे नुसते संदेश देऊन चालत नाही तर त्यासाठी प्रसंगी जीव ओवाळून टाकणारी माणसं या जगात आहेत याचा प्रत्यय ठाणे जिल्ह्यातील विहिगावात आला. जखमी झालेल्या गर्भवती गाईला बैलगाडीत घालून भरउन्हात ती गाडी स्वत: ओढत नेऊन तिच्यावर  उपचार करण्यासाठी अख्खे कुटुंब धावले. हे पाहून त्या मुक्या जिवाच्याही डोळ्यात अश्रू तरळले. आयुष्यभर आधार देणारी ‘ढवळी’ अपघातात जायबंदी झाली. तिला  वाचवण्यासाठी घरातील मुला-बाळांनी तिला बैलगाडीमध्ये टाकले. बैलांच्या जागी स्वत:ला जुंपले. भर उन्हात बैलगाडी ओढत तिला पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल केले. मूलभूत साधनांअभावी ग्रामीण भागात जगणे  आजही कष्टप्रद आहे मात्र तिथे भूतदया आजही जिवंत आहे, हे यातून दिसले. 

गाेमातेच्या डोळ्यात अश्रू -कसारा घाटातून जव्हारकडे जाणाऱ्या मार्गावरील विहिगावात तुकाराम तेलम यांचे कुटुंब दाेन बहिणी ढवळी आणि पवळी या गायींचे दूध विकून उदरनिर्वाह चालवते. सोमवारी तुकाराम गायींना चरण्यासाठी शेतावर घेऊन गेले असता ढवळीचा पाय घसरून सहा ते सात फूट खोल खड्ड्यात पडली. ग्रामस्थांच्या मदतीने ढवळीला कसेबसे बाहेर काढले. यात ढवळीचे कमरेचे हाड मोडले. ती गर्भवती आहे. गावात पशुवैद्यक नसून कोणतीही वाहनाची सुविधा नसल्याने कुटुंबाने तिला बैलगाडीतून जवळपास दोन किलोमीटरचा पट्टा पार केला.

टॅग्स :cowगायthaneठाणे