शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

संकटग्रस्तांच्या मदतीतही ‘दुष्काळ’; शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 11:15 PM

ठाणे-पालघरने मागितले ७४ कोटी, दिले अवघे १७.९४ कोटी

- नारायण जाधवठाणे : क्यार व महा या चक्रीवादळांमुळे ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात कोसळलेल्या अवेळी पावसामुळे ठाणे व पालघर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची १०० टक्के शेती नष्ट होऊन कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. यामुळे ओल्या दुष्काळाचे संकट असून दोन्ही जिल्ह्यांच्या प्रशासनाने शेतपिकांच्या नुकसानीचे युद्धपातळीवर पंचनामे करून आपले अहवाल राज्य शासनाकडे पाठविले. त्यानुसार सध्या राष्ट्रपती राजवटीच्या वरवंट्याखाली चिरडलेल्या या दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या जखमेवर फुंकर घालण्याऐवजी राज्य शासनाने राज्यपालांच्या निर्देशानुसार दोन्ही जिल्ह्यांसाठी अवघी १७ कोटी ९३ लाख ७६ हजार इतकी तुटपुंजी मदत वितरित करून मीठ चोळले आहे.यात ठाण्याचा वाटा आठ कोटी २० लाख ६८ हजार तर पालघरचा हिस्सा नऊ कोटी ७३ लाख आठ हजार रुपयांचा आहे. दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंतच ती देण्यात आली आहे.ठाणे जिल्ह्यातील ४२ हजार २६२.३१ हेक्टरवरीलभातपिकाच्या नुकसानीपोटी सुमारे ३३ कोटी ८० लाख ९६ हजार रुपयेवरी पिकाच्या ३७ हेक्टरच्या नुकसानीसाठी दोन लाख ९६ हजार रुपयेनागलीच्या १२७ हेक्टरवरील नुकसानीसाठी १० लाख १६ हजाररायगड जिल्ह्याला अवघी पाच कोटी १७ लाख १४ हजार इतकी नुकसानभरपाई मिळणार आहे.असे अंदाजे ३४ कोटींची नुकसानभरपाई मिळणे अपेक्षित होते. परंतु, प्रत्यक्षात राज्य शासनाने सोमवारी ठाणे जिल्ह्यांकरीता अवघी आठ कोटी २० लाख ६८ हजार नुकसानभरपाई वितरीत करून संकटग्रस्त शेतकºयांच्या जखमेवर एकप्रकारे मीठ चोळले आहे.राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ३२५ तालुक्यांसाठी ही मदत दोन हजार ५९ कोटी ३६ लाख ६५ हजार इतकी आहे. यात शेतपिकांसाठी हेक्टरी ८ हजार तर फळबागांसाठी ती हेक्टरी १८ हजार इतकी तुटपुंजी आहे.77128 शेतकºयांचे अवेळी पावसाने ठाणे जिल्ह्यातील ४२ हजार ४२६.३१ हेक्टर शेतमालाचे नुकसान झाले असून, जिल्हा प्रशासनाने पंचनामे करून यापोटी सुमारे ३४ कोटी रुपये नुकसानभरपाई मिळावी, असा अहवाल पाठविला होता.३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झालेल्यांना भरपाई नाहीविशेष म्हणजे जी तुटपुंजी मदत केली आहे ती प्रचलित शासने नियमानुसार 33 टक्के किंवा त्याहून जास्त ज्यांचे नुकसान झाले आहे, अशा शेतकºयांनाच मिळणार असून याठिकाणीही ३३ टक्केपेक्षा कमी नुकसान झालेल्या शेतकºयांना कोणतीही नुकसान मिळणार नसल्याने शेतकºयांत संताप व्यक्त होत आहे.मच्छीमार मदतीच्या प्रतीक्षेतपालघरमध्ये शेतकºयांसह मच्छिमारांचेही मोठे नुकसान झाले आहे. मात्र, शेतकºयांना तुटपुंजी मदत जाहिर करणाºया शासनाने मच्छिमारांना कोणतीच मदत वितरीत केलेली नाही. हिच अवस्था ठाणे जिल्ह्यातील मच्छिमारांचीही आहे. त्यांना नुकसानभरपार्ई कधी मिळणार, या प्रतीक्षेत दोन्ही जिल्ह्यांतील मच्छिमार आहेत.पालघर जिल्ह्यातही परतीच्या पावसाने सुमारे ५० हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. जुन्या शासकीय निकषानुसार ३५ - ४० कोटी रु पयांचे नुकसान झाल्याचा अहवाल तेथील जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठविला आहे. मात्र, प्रत्यक्षात पालघरच्या वाट्याला नऊ कोटी ७३ लाख आठ हजार रुपयांचीच नुकसानभरपाई शासनाने वितरीत केली आहे.दोन हेक्टरपेक्षा जास्त नुकसानग्रस्त शेतकºयांना सोडले वाºयावरअवकाळी पावसाने राज्यभरातील शेतकºयांची १०० टक्के शेती नष्ट झाली असली तरी राज्य शासनाने मदत देतांना दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत मदत वितरीत केली आहे. ज्यांचे दोन हेक्टरपेक्षा जास्त नुकसान झाले आहे, त्यांना त्यापेक्षा जास्त क्षेत्रावरील शेतपिकांच्या नुकसानीची भरपाई न देता शासनाने वाºयावर सोडले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी