शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
2
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
3
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
4
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
5
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
6
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
7
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
8
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
9
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
10
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
11
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

शेतकरी आले रस्त्यावर; आठवडे बाजार झाला कायमचा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 12:22 AM

सरकारने सुरू केलेला शेतकरी आठवडा बाजार भाईंदर पालिकेने मीनाताई ठाकरे मंडईतील हॉलच्या कंत्राटदाराचा फायदा व्हावा यासाठी कायमचा बंद केला.

मीरा रोड : सरकारने सुरू केलेला शेतकरी आठवडा बाजार भाईंदर पालिकेने मीनाताई ठाकरे मंडईतील हॉलच्या कंत्राटदाराचा फायदा व्हावा यासाठी कायमचा बंद केला. पालिकेने तसे पत्रच काढल्याने रविवारी नाशिकहून आलेल्या शेतकऱ्यांना हुसकावून लावले. यामुळे त्यांना रस्त्यावर बसून भाजी विकण्याची वेळ आली.रामदेव पार्कमागील ठाकरे मंडई व हॉलचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्या आधीपासून मुख्यमंत्र्यांच्याच संत शिरोमणी सावतामाळी शेतकरी आठवडे बाजार योजने अंतर्गत पणन विभागाच्या मंजुरीने येथे दर रविवारी शेतकरी आठवडे बाजार भरत होता. परंतु पालिकेने मंडई आणि शॉपिंग सेंटरच्या आरक्षणात बेकायदा हॉल बांधून तळ मजल्यावरील मंडई व दुकानेही कंत्राटगारास दिल्यापासून आवारातील मोकळ्या जागेत बसणाऱ्या शेतकऱ्यांना सातत्याने हुसकावुन लावण्याचा खटाटोप पालिका आणि सत्ताधारी भाजपाने चालवला होता. त्यासाठी आयुक्तांनी बांधकाम विभागाचा प्रस्ताव महापौर डिंपल मेहतांकडे दिल्यावर त्यांनी महासभेत आणला व शेतकरी आठवडे बाजार बंद करण्याचा ठराव बहुमताने मंजूर केला. ठराव झाल्यानंतर कंत्राटदार तसेच पालिकेने गेल्या रविवारीही शेतकºयांना हुसकावून लावले होते.गेल्या शुक्रवारी तर कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांनी पत्र काढून ठाकरे मंडईतील बाजार बंद करावा असा फतवा शेतकºयांना काढला. त्यामुळे रविवारी पहाटे नाशिकहून आलेल्या शेतकºयांना पालिकेने आवारात घेतलेच नाही. त्यामुळे बिचाºया शेतकरयांना रस्त्यावरच आपला आणलेला भाजीपाला विकण्यास बसण्याची वेळ आली. परंतु येथील स्थानिक रहिवाशांसह विविध संघटनांनी मात्र शेकतºयांचा आठवडे बाजार बंद करू नये अशी मागणी सातत्याने चालवली आहे. चांगला आणि माफक दरात भाजीपाला मिळत असताना कंत्राटदाराच्या फायद्यासाठी आठवड्याच्या अर्ध्या दिवसाकरिताही जागा पालिका व सत्ताधारी शेतकºयांना देत नसल्याबद्दल संताप व्यक्त होत आहे.पालिकेने पदपथावर दिली शेतकºयांना जागाएकीकडे पदपथ नागरिकांना चालण्यासाठी मोकळे करायचे असताना पालिकेने चक्क शेतकºयांना कनकिया व मॅक्सस मॉल येथे पदपथावर जागा दिली आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMarketबाजार