ठाणे - मुंबई ठाणेमेट्रोसाठी घोडबंदर भागातील कावेसर वाघबीळ येथे यार्ड उभारण्याचे काम मेट्रो कंपनी मार्फत सुरु झाले आहे. त्यानुसार येथे मातीचा भराव टाकण्याचे काम सुरु झाले आहे होते. परंतु येथील शेतकरी जमीन देण्यास तयार असतांना सुध्दा त्यांच्या मागणीचा विचार न झाल्याने आमदार प्रताप सरनाईक यांनी येथील काम बंद पाडले होते. त्यानंतर मंगळवारी जिल्हाधिकारी यांच्या समवेत झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांना न्याय देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर १६ नोव्हेंबर पासून पुन्हा यार्डच्या कामाला सुरवात होणार आहे. येथील जमिनीच्या संपादनासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून एमएमआरडीएची नियुक्ती करण्यात आली असून या कामासाठी एमएमअरडीएने रिलायन्स कंपनीस ठेका दिला आहे. त्यानुसार या कंपनीने या जागेवर काम चालू केले आहे. प्रत्यक्षात ही जागा शेतजमीन येथील स्थानिक शेतकऱ्यांच्या असून ते या शेतजमिन पिढ्यांपिढ्यांपासून कसत आहेत. मात्र या शेतकºयांना विश्वासात न घेता शेतजमनीत मातीभरणीचे काम सुरु झाले आहे. येथील शेतकरी मुंबई ठाणे मेट्रोसाठी लागणारे कास्टींग यार्ड उभारण्यासाठी त्यांच्या शेतजमीनी देण्यास तयार आहेत. परंतु या जमिनीचा मोबदला पैशाच्या स्वरुपात द्यावा किंवा या जमिनीचे भाडे सुरु करावे अशी मागणी यापूर्वी सरनाईक यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली होती. दरम्यान आमदार सरनाईक यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता, त्याठिकाणी मातीचा भराव टाकण्याचे काम सुरु होते. त्यानंतर त्यांनी हे काम बंद पाडले होते. दरम्यान मंगळवारी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली असता सरनाईक यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडली. सर्वे नं. ३११,३१३,३१४, ३१५ या शेतजमिनीचे शेतकºयांकडे असलेली कागदपत्रे १५ नोव्हेंबर २०१८ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करावीत व सर्व्हे नं. २६७ ही जमिन वहिवाट शेतकरी गेल्या ६० वर्षांपासून नावावर करण्यासाठी पाठपुरावा करत होते. ती जमीन वहिवाट नावावर करून देण्याचा निर्णय या बैठकीत करण्यात आला. त्यामुळे मुंबई मेट्रोसाठी लागणारे कास्टिंग यार्ड उभारण्यासाठीचे काम आता १६ नोव्हेंबर पासून सुरु होणार आहे.
घोडबंदर भागातील मेट्रो यार्डच्या बाधीत शेतकऱ्यांना मिळाला अखेर न्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 6:09 PM
मागील काही दिवसापासून थांबलेल्या मेट्रो यार्डचे काम आता येत्या १६ नोव्हेंबर पासून पुन्हा सुरु होणार आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत बाधीत होणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य तो न्याय देण्याचा निर्णय घेण्यात आला.
ठळक मुद्देमेट्रो यार्डचे काम १६ नोव्हेंबर पासून होणार सुरुजिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत झाला निर्णय