शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

पर्यावरणास घातक मांगुर माशांची शेती करणाऱ्यावर भिवंडीत गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2020 11:37 PM

राष्ट्रीय हरित लवाद यांनी  मांगुर माशाच्या उत्पादन व विक्रीवर बंदी घातली आहे.

- सुरेश लोखंडे ठाणे : मांगूर जातीच्या माशांची बेकायदेशीर शेती केल्या प्रकरणी भिवंडी तालुक्यातील 'सारीगाव आसनोली येथील आदेश भोईर यांच्या विरूध्द गणेशपुरी पोलिसठाण्यामध्ये फिर्याद दाखल करण्यात आली असुन बेकायदेशीर मत्स्यसाठा नष्ट करण्यात आला आहे. सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय ठाणे यांनी आज ही कारवाई केली. 

राष्ट्रीय हरित लवाद यांनी  मांगुर माशाच्या उत्पादन व विक्रीवर बंदी घातली आहे.  मांगुरचे उत्पादन घेतांना माशांना कोंबड्यांचे, कत्तलखान्यात कुजलेले शेळी-मेंढी गाई-म्हशी इत्यादींचे खाद्य म्हणून वापरले जाते. त्यामुळे पर्यावरणाची हानी होते व हा मासा मानवी प्रकृती घातक आहे. त्यामुळे राष्ट्रीय हरित लवाद यांनी 22 जानेवारी 2019 च्या निर्णयाद्वारे बंदी घातली आहे. त्यामुळे राज्यात मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी  मागूर मत्स्य उत्पादक व मत्स्य वाहतूक करणारे यांच्यावर कारवाई तसेच मागुर माशाचे अस्तित्वात असलेले मत्स्यसाठे  नष्ट करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यात मत्स्य व्यवसाय  आयुक्त राजिव जाधव यांच्या आदेशानुसार प्रादेशिक उपायुक्त महेश देवरे यांच्या मार्गदर्शनानुसार  कारवाई करण्यात येत आहे. 

बेकायदेशीर शेती करणार्‍या या ठिकाणी मत्स्य विभागातील अधिकार्‍यांनी  भेट देऊन  शेती नष्ट करण्याची  नोटिस  दिली  होती . मात्र तरीही याकडे दुलर्क्ष करून शेती सुरूच ठेवण्यात आल्याने मत्स्य विभागाने आज  कारवाई केली.  सहाय्यक आयुक्त ठाणे अजिंक्य पाटील  यांनी सांगितले की, मांगूर माशांची शेती करण्यावर भारतातच कायद्याने बंदी आहे. त्यामुळे ठाणे  जिल्ह्यात अनधिकृतपणे मत्स्य शेती करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.तसेच कडक कारवाई करण्यात येणार आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्रRaigadरायगड