सुरेश लोखंडे
ठाणे : यंदाच्या खरीप हंगामाची पीक हातात येण्याच्या कालावधीत आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घेतला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. यात ठाणे जिल्ह्यातील ७७ हजार १२८ आणि पालघर जिल्ह्यातील एक लाख १४ हजार ९६२ शेतकºयांचे नुकसान झाले आहे. या शेतकºयांना आतापर्यंत ५७ कोटी १३ लाख २६ हजार इतकी भरपाई मिळाली आहे. यात ठाण्याचा वाटा २६ कोटी १३ लाख ६६ हजार तर पालघर जिल्ह्याचा वाटा ३० कोटी ९९ लाख ६० हजार इतका आहे.
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या नुकसानभरपाई देण्यासाठी ३४ कोटी रुपयांची मागणी ठाणे जिल्हा प्रशासनाने केली आहे. यापैकी आतापर्यंत २६ कोटींची नुकसानभरपाई वाटप झाली आहे. उर्वरित आठ कोटी रुपये लवकरात मिळावेत, असा लकडा जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे लावून धरला आहे. नुकसानभरपाईची रक्कम शेतकºयांना आतापर्यंत दोन टप्प्यात वाटप झाली आहे. पहिल्या टप्प्यात आठ कोटी २० लाख ६८ हजार रुपये आले आहेत. यानंतर पुन्हा १७ कोटी ९२ लाख ९८ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला.यानुसार या दोन टप्यात २६ कोटी १३ लाख ६६ हजारांचा निधीचे ठाणे जिल्ह्यात वाटप झाल्याचे उघड झाले आहे.ठाणे जिल्ह्यासाठी आठ कोटी येणे बाकीच्राज्य शासनाने शेतकºयांच्या नुकसानभरपाईसाठी नुकतीच पाच हजार ३०० कोटींची भरपाई रक्कम मंजूर केली आहे. त्यातून जिल्ह्यातील शेतकºयांच्या नुकसानभरपाईच्च्या दृष्टीने दुसºया टप्प्यात २६ कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा होती.च्पण १७ कोटी ९२ लाख ९८ हजार रुपये प्राप्त झाले होते. जिल्ह्यातील शेतकºयांचे अवकाळी पावसामुळे ३३ कोटी ९४ लाखांचे नुकसान झाले आहेत.च्यापैकी आता २६ कोटींचे वाटप झाले आहेत. उर्वरित आठ कोटींची नुकसानभरपाई मिळण्याची अपेक्षा आहे.ठाणे जिल्ह्यात ३६ तर पालघरमध्ये ८० टक्के भरपाईचे वाटपच्पालघर जिल्ह्यातील एक लाख १४ हजार ९६२ शेतकºयांच्या शेतीचे नुकसान झाले आहेत. या शेतकºयांना आतापर्यंत ३० कोटी ९९ लाख ६० हजार रुपये वाटप झाले.च्अशाप्रकारे पालघर जिल्ह्यात आतापर्यंत ८०.९ टक्के नुकसानभरपाई शेतकºयांना वाटप झाली आहे. तर ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत ३५.९१ टक्के नुकसानभरपाईची रक्कम वाटप झाली आहे.