लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : श्रावणातील उपवासामुळे शेंगदाणे आणि साबुदाण्याची मागणी वाढली असून, पुरवठा कमी असल्याने दरही वाढले आहेत. शेंगदाणे, साबुदाण्यामध्ये किलोमागे सहा रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे आधीच कोविडमुळे रोजगार आणि व्यवसाय बुडालेल्या सर्वसामान्यांचे या महागाईने कंबरडेच मोडले आहे.
उपवासाच्या पदार्थांचे दर वाढलेल्या श्रद्धाळूंवर सक्तीचे निरंकारी उपवास करण्याची वेळ आली आहे. यामुळे त्यांच्यातही प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
१) असे वाढले दर (प्रतिकिलो)
श्रावणाआधी आता
साबुदाणा ५०-५६
शेंगदाणे ९६-११२
२) उपवासाच्या पदार्थांमध्ये हमखास साबुदाणा आणि शेंगदाण्याचा वापर असतो. मागणी वाढल्यामुळे साबुदाणा आणि शेंगदाण्याचे दर वाढले आहेत.
३) भगरीचे दरदेखील वाढले आहेत. भगर आधी ८० रुपये, तर आता ११२ रुपये किलो आहे. शहापूर येथून भगर येत असते. तेथे पाऊस झाल्याने त्याचा परिणाम भगरच्या दरावर झाला आहे, असे किराणा विक्रेत्यांनी सांगितले.
४) श्रावणात अनेकांना उपवास असतो. त्यामुळे साबुदाणा, शेंगदाणायुक्त पदार्थांना मागणी असते. उपवासाला साबुदाणा खिचडी हमखास असते, तसेच इतर पदार्थही बनविले जातात. त्यामुळे श्रावणात मागणी वाढल्याने साबुदाणा आणि शेंगदाण्याचे दर वाढले आहेत.
-वासुदेव आरबूज, किराणा विक्रेते