ठाणे : प्रॉपर्टीच्या वादातून मुलावर प्राणघातक हल्ला करून जीवे मारणाºया वडिलांना ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवून मंगळवारी १० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. ही घटना ३० सप्टेंबर २०१६ रोजी घडली.घोडबंदर रोड येथील पातलीपाडा परिसरात राजेश सोनी (७१) आणि मुलगा रविशंकर सोनी (२८) यांच्या मालकीच्या सहा खोल्यांची सोनी चाळ आहे. चाळीतील खोल्यांच्या मालकीवरून दोघांमध्ये वाद सुरू होते. यातील एक खोली राजेशनी आपल्या मुलीच्या नावावर केली होती. त्यानंतर, रविशंकरनेही काही खोल्या आपल्या पत्नीच्या नावावर केल्या. त्यावरून पितापुत्रामध्ये वाद सुरू झाले. ३० सप्टेंबर २०१६ रोजी पुन्हा दोघांमध्ये वाद झाला. तो शिगेला पोहोचून त्यातूनच राजेशनी चाकूने हातावर आणि पोटावर वार केल्याने रविशंकर हा गंभीररीत्या जखमी झाला. त्यानंतर, त्याचा १ आॅक्टोबर रोजी मृत्यू झाला.कासारवडवली पोलीस ठाण्यात राजेश विरु द्ध कलम ३२६ अंतर्गत गुन्हा दाखल होता. मात्र, मुलाचा मृत्यू झाल्याने या गुन्ह्यात हत्येचे कलम वाढवले. हे प्रकरण न्यायाधीश जी.पी. शिरसाठ यांच्या न्यायालयात आल्यावर सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी सादर केलेले पुरावे, युक्तिवाद आणि साक्षीदारांची साक्ष ग्राह्यमानली.पितापुत्रांना मद्याचे व्यसन होते. त्यामुळे सदोष मनुष्यवध असला तरी राजेश विरुद्ध ३०४ अंतर्गत आरोपी सिद्ध झाला. त्यानुसार, त्याला १० वर्षे कारावास, पाच हजार दंडाची शिक्षा सुनावली.
प्रॉपर्टीच्या वादातून मुलाची हत्या करणाऱ्या पित्याला १० वर्षे कारावास
By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2020 2:41 AM