शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

मध्य रेल्वेच्या नव्या वेळापत्रकाचा पहिल्याच दिवशी उडाला फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 11:41 PM

लोकल धावल्या विलंबाने । कसारा मार्गावरील प्रवाशांना फटका

डोंबिवली : मध्य रेल्वेच्या उपनगरी लोकलचे नवीन वेळापत्रक शनिवारपासून अमलात आले. मात्र, पहिल्याच दिवशी कर्जत, कसारा येथून लोकल विलंबाने धावल्याने या वेळापत्रकाचा फज्जा उडाला. विशेषत: कसारा मार्गावरील हजारो प्रवाशांना त्याचा फटका बसला. नव्या वेळापत्रकाबाबत प्रवासी समाधानी नसल्याचे कल्याण-कसारा रेल्वे पॅसेंजर असोसिएशनचे सचिव उमेश विशे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.विशे म्हणाले की, एरव्ही कसारा येथून पहाटे ४.२५ वाजता सुटणारी लोकल शनिवारी नवीन वेळापत्रकानुसार पहाटे ३.५१ वाजता सुटली. त्यामुळे अनेकांची ही लोकल चुकली. त्यानंतर, पहाटे ५ वाजता सुटलेल्या लोकलला प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने त्यांना त्रासाला सामोरे जावे लागले.

कसाऱ्याहून पूर्वी पहाटे सुटणाºया पहिल्या दोन लोकलमध्ये २५ मिनिटांचा फरक होता. मात्र, आता हा फरक एक तास नऊ मिनिटांचा झाल्याने पहिली लोकल चुकल्यास चाकरमान्यांना तासभर ताटकळत बसावे लागणार आहे. पहिली लोकल पकडल्यास अनेकांपुढे कामाच्या ठिकाणी जाऊन बाहेर बसण्याशिवाय पर्याय नाही. दुसरीकडे शनिवारी पहाटे ५ वाजता कसाºयाहून सुटलेल्या दुसºया लोकलला आसनगाव स्थानकातच प्रचंड गर्दी झाली. त्यामुळे वासिंद, खडवली येथील प्रवाशांना या लोकलमध्ये चढताही आले नाही. हा त्रास कमी करण्यासाठी टिटवाळा येथे पहाटे ५ वाजून ५ मिनिटांनी सुटणारी लोकल आसनगाव येथून सोडावी, अशी मागणी प्रवाशांनी केली.उद्या आणखी गोंधळ उडण्याची शक्यतानव्या वेळापत्रकामुळे शनिवारी सकाळच्या पहिल्या सत्रात कल्याणपलीकडील प्रवाशांच्या नियोजनावर पाणी फिरले गेले. परंतु, सोमवारी या लोकलना गर्दी वाढेल. त्यामुळे अधिक गोंधळ उडेल. तेव्हा मात्र प्रवास करणे अवघड होईल, असेही विशे म्हणाले.