मुरलीधर भवार, डोंबिवलीऔद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे कार्यालय कल्याण येथे आहे. मात्र या कार्यालयाची कार्यकक्षा मोठी आणि त्यांच्याकडे असलेला अधिकारी व कर्मचारी वर्ग अपुरा असल्याने औद्योगिक सुरक्षा तपासणी वाऱ्यावर असल्याचे उघड झाले आहे. ही स्थिती कारखान्यांत काम करणाऱ्या कामगारांचे भय वाढवणारी ठरते आहे.अल्ट्रा प्यूअर कंपनीला लागलेल्या भीषण आगीच्या घटनेनंतर औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. सुरक्षेचे नियम पाळले जातात की नाही, या बाबी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाकडून योग्य प्रकारे तपासल्याच जात नसल्याचे आगीच्या घटनांवरून उघड होत आहे. या संचालनालयास पुरेसा अधिकारी व कर्मचारी वर्ग पुरविण्याकडे सरकारी यंत्रणांचीही अनास्था असल्याने भविष्यात डोंबिवलीतील औद्योगिक परिसरातील कारखान्यांंमध्ये एखादी मोठी दुर्घटना होण्याची सरकार वाट बघते काय, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. डोंबिवलीत औद्योगिक क्षेत्रात फेज वन आणि टू असे दोन फेज आहेत. त्यात जवळपास ४५० कारखाने सुरू आहेत. तितकेच कारखाने अंबरनाथ औद्योगिक परिसरात सुरू आहेत. अंबरनाथ, बदलापूर, डोंबिवलीसह मुरबााड परिसरातील औद्योगिक वसाहतीत कारखान्यांची संख्या मोठी आहे. जवळपास एक हजार कारखाने औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या कल्याण कार्यालयांतर्गत येतात. कमी स्टाफमुळे सगळ््याच कारखान्यांना भेटी देऊन त्यांच्या सुरक्षितेतीच तपासणी केली जात नाही. ही वस्तूस्थिती आहे. स्टाफ कमी असल्याने कारखान्याचे सुरक्षा लेखा परीक्षण संचालनालयाच्या कार्यालयामार्फत केले जात नाही. तसेच त्रयस्थ संस्थाकडूनही करून घेतले जात नाही. जे कारखाने कायद्यातील तरतुदीनुसार चालतात. त्यांचे सुरक्षा लेखा परीक्षण हे त्या कारखान्यांमार्फत केले जाते अशी माहिती औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाकडून सांगण्यात येते. खाजगी जमिनीवरील कारखान्यास अधिनियम लागू होता. मात्र भिवंडीसारख्या शहरातील बेकायदा गोडावून औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या नियंत्रणाखाली येत नाही. त्यामुळे त्यांची सुरक्षितता व आरोग्याचा प्रश्न कोणी हाताळायचा, त्यांच्यावर कारवाई कोणी करायची हा प्रश्न यामुळे निरुत्तीतच राहतो. केवळ भंगार गोदामे ही भिवंडीत नाहीत. तर कल्याण डोंबिवलीसह अन्य शहरातील बेकायदा गोदामे आहेत. त्यांची संख्या बरीच मोठी आहे. २०११ ते २०१४ या कालावधील डोंबिवलीतील घरडा केमिकल्स, विनायक टेक्सटाईल्स, अल्केमी लॅबोरेटीज, र्व्हसटाईल्स केमिकल्स, पायोनेअर डाईंग, महेश टेक्सटाईल्स, तारकेम इंटस्ट्रीज, महावीर डाईंग, श्रीजी टेक्सटाईल्स, सनबीम मोनोकेम, आरती केल्थ केअर, ओरेक्स फार्मा आणि जॅक अॅड जिल्स कंपनी या १३ कंपन्यांमध्ये आगीच्या घटना घडल्या होत्या. आगीच्या व स्फोटाच्या घटनांमध्ये १३ जणांना प्राण गमावावे लागले. तर १६ जण जखमी झाले. २७ अपघाताच्या घटना घडल्या. त्यापैकी काही कारखान्यांच्या विरोधात संचालनालयााने खटले दाखल केले. तर काहींच्या विरोधात संचालनालयास खटलेच दाखल करता आले नाही. कारण त्याठिकाणी कोणत्याही नियमावलीचा भंग झाला नाही. तरी देखील आग लागली.
कारखान्यांत सुरक्षेचे भय वाढले!
By admin | Published: March 07, 2016 2:20 AM