- जितेंद्र कालेकरठाणे : महिना उलटूनही महिला पोलीस कॉन्स्टेबल आत्महत्या प्रकरणातील कथित आरोपी सहायक पोलीस आयुक्त एस.बी. निपुंगे हे अद्यापही फरारच आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांची पोलीस उपायुक्तांकडून प्राथमिक प्रशासकीय चौकशी सुरू झाली आहे. त्यांच्यावरील आत्महत्येस प्रवृत्त करण्यासारख्या गंभीर आरोपानंतर ते थेट सिक रजेवर गायब झाले. प्रशासकीय शिस्त मोडल्यामुळे त्यांच्यावर आता थेट निलंबनाची कारवाई करण्यात यावी, असा प्रस्तावच ठाणे पोलीस आयुक्तालयाने राज्य शासनाकडे पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील कॉन्स्टेबल सुभद्रा पवार हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या निपुंगे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज ठाणे जिल्हा सत्र न्यायाधीश आर.एन. बावनकर यांनी फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. एकीकडे त्यांना कोणत्याही क्षणी अटक करण्याची कार्यवाही पोलिसांनी केली आहे. याआधीच त्यांच्या शोधासाठी दोन पथके तयार केली आहे.जुलै २०१७ पासून त्यांनी सुभद्रा हिचा केलेला छळ, त्यांनी तिला केलेले वारंवार फोन अशा सर्व बाबी विचारात घेऊन ठाणे न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. मात्र, आपला या प्रकरणाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसून तपास पथकाला सर्व प्रकारे सहकार्य करण्याची पूर्ण तयारी दर्शवणाºया निपुंगे यांनी ६ सप्टेंबरनंतर तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त रमेश धुमाळ किंवा पोलीस आयुक्तालयातील कोणत्याही वरिष्ठ अधिकाºयाकडे शरणागती पत्करली नाही. या प्रकरणातील अन्य एकासह आरोपी मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबल तथा सुभद्राचा भावी पती अमोल फापाळे याला चौकशीअंती २७ सप्टेंबर रोजी पोलिसांनी अटक केली. ६ सप्टेंबरपासून निपुंगे हे मात्र वैद्यकीय कारण देऊन दीर्घ रजेवर गेले आहेत. त्यांचा फोनही नॉट रिचेबल लागत आहे. सुरुवातीला मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त संदीप पालवे यांनी त्यांना आजाराचे नेमके स्पष्टीकरण देण्यासाठी एक आठवड्याच्या आत हजर राहण्याचे किंवा तशी कागदपत्रे सादर करण्याचे आदेश नोटीसद्वारे दिले होते. या नोटीसलाही न जुमानता ते अजूनही संपर्क कक्षाच्या बाहेरच आहेत.त्यांच्यावरील आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यातील आरोपांचा तपास अधिकारी रमेश धुमाळ यांचा अहवाल तसेच मुख्यालयाच्या उपायुक्त डॉ. प्रिया नारनवरे यांच्या कार्यालयाचा बेकायदेशीरपणे सिक रजेवर गेल्याबाबतचा अहवाल मिळाल्यानंतर पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा प्रस्ताव आता राज्य शासनाकडे पाठवल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली. याबाबत, उपायुक्त नारनवरे यांनीही दुजोरा दिला.उपायुक्तांमार्फतही चौकशीनिपुंगे यांची विभागीय चौकशी करण्यापूर्वी या प्रकरणातील तथ्यता पडताळणारी पोलीस प्रशासनाकडील प्राथमिक चौकशीही सुरू करण्यात आली आहे. ती आता वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्यामार्फत करण्यात येत आहे.चार वेगवेगळ्या ठिकाणी चौकशी- कळवा पोलिसांकडील महिला पोलीस कॉन्स्टेबल सुभद्रा पवार हिला आत्महत्येस प्रवृत्त केलेल्या प्रकरणाची एसीपी धुमाळ यांच्याकडील चौकशी ६ सप्टेंबरपासूनच सुरू आहे.- त्यानंतर अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेतही हे प्रकरण आहे.- तिसरी प्रशासकीय कारवाईसाठी आता उपायुक्त काळे यांच्यामार्फत प्राथमिक चौकशी सुरू आहे.- राज्य शासनाकडे त्यांच्या निलंबनाच्या कारवाईचा प्रस्तावही पाठवण्यात आला आहे. त्याबाबतचीही अन्य चौकशी, अशा चार वेगवेगळ्या स्तरांवर आता निपुंगेंची चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.