भिवंडी : पर्यावरण विभागाने पालिका क्षेत्रात १६ शांतता क्षेत्रांची घोषणा केवळ कागदावर जाहीर केली असून त्या ठिकाणी पालिकेने शांतातक्षेत्र दर्शविणारे फलकही लावलेले नाहीत. तसेच या क्षेत्रात पोलीस किंवा पालिका कर्मचाऱ्यांकडून शांतता भंग करणाºयांवर कारवाईही झालेली नाही.
नागरी वस्तीत कर्कश हॉर्न वाजविले जात असल्याने नागरिक बेजार झाले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे महापालिकेने १६ शांतता क्षेत्राची यादी जाहीर केली. त्यात दिवाणी व फौजदारी न्यायालय, इंदिरा गांधी स्मृती रूग्णालय,चाविंद्रा रोड पालिका शाळा, ममता रूग्णालय, एसएनडीटी कॉलेज कल्याणरोड, महापालिका शाळा क्र. ४६ पोलीस लाईन, सरकारी तंत्रनिकेतन(आयटीआय),पद्मश्री आण्णासाहेब जाधव शाळा, शेट जुगीलाल पोद्दार शाळा, बी.एन.एन.कॉलेज, पी.टी.हायस्कूल, ओसवाल शाळा,कान्हा चौधरी शाळा,जयराम सखाराम टावरे शाळा, गुरूकृपा रूग्णालय, पीली शाळा (निजामपूर) यांचा समावेश आहे. त्यापैकी काही शांतता क्षेत्र हे शांततेच्या ठिकाणीच आहेत. उच्च न्यायालयाने शांतता क्षेत्र जाहीर करण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाकडे दिली होती. परंतु प्रशासनाकडून त्याचे पालन न झाल्याने शांतता क्षेत्र जाहीर करण्याची जबाबदारी राज्य सरकारने स्वत:कडे घेतली. शहरात वंजारपाटी नाका ते कल्याणरोड या मार्गावर न्यायालयासह, रूग्णालय व सरकारी कार्यालये आहेत. असे असताना या मार्गावर नेहमी मोर्चे-आंदोलने होऊन घोषणा दिल्या जातात. तसेच या मार्गावर होणाºया वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक हॉर्न वाजवून शांतता भंग करतात.मात्र आजतागायत कुणावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. त्याचप्रमाणे शहरात अनेक राजकीय पक्षांना बाईकरॅली काढण्यास परवानगी दिली जाते. त्या बाईकरॅली पोलीस ठाण्यासमोरून कर्कश हॉर्न वाजवत जातात. त्यांना पोलीस आवर घालत नाही.वाचनालय परिसरात गोंगाटच्शांतता क्षेत्र जाहीर करताना टिळक वाचन मंदिर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाकडे पालिकेने पूर्णत: दुर्लक्ष केले आहे.च्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या अभ्यासिका आहेत. सर्वच वाचनालयाच्या परिसराचा शांतता क्षेत्रात समावेश करा अशी मागणी होत आहे.