शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

पाचव्या माय ठाणे शॅार्ट फिल्म फेस्टिव्हलचे उद्घाटन अॅड.निरंजन डावखरे यांच्या हस्ते संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 4:56 PM

पाचव्या माय ठाणे शॅार्ट फिल्म फेस्टिव्हलचे उद्घाटन पार पडले.  

ठळक मुद्देपाचव्या माय ठाणे शॅार्ट फिल्म फेस्टिव्हलचे उद्घाटन अॅड.निरंजन डावखरे यांच्या हस्ते उद्घाटन महोत्सवात देशभरातून दीडशेहून अधिक शॉर्टफिल्म

ठाणे : ब्ल्यू एंटरटेनमेंट व सतीश प्रधान ज्ञानसाधना कॉलेज ठाणे यांची प्रस्तुती असलेल्या पाचव्या माय ठाणे शॉर्ट फिल्म फेस्टिवल डिसेंबर 2019 या दोन दिवसीय फेस्टिव्हलचे उद्घाटन अॅड. निरंजन डावखरे आमदार कोकण पदवीधर मतदारसंघ यांच्या हस्ते शनिवारी   करण्यात आले.      देशभरातून दीडशेहून अधिक शॉर्टफिल्मने या महोत्सवात सहभाग घेतला आहे उद्घाटनाच्या प्रसंगी सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाचे अध्यक्ष सतीश प्रधान, सचिव कमलेश प्रधान खजिनदार सतीश शेठ तसेच आदर्श विकास मंडळचे अध्यक्ष सचिन मोरे उपस्थित होते. शॉर्ट फिल्म हे कमी वेळात सामाजिक समस्यांबाबत खूप प्रभावी भाष्य करणारे माध्यम आहे असे प्रतिपादन अॅड. निरंजन डावखरे यांनी केले तर सतिश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाचे अध्यक्ष सतीश प्रधान यांनी शॉर्टफिल्म ही चळवळ ठाण्यातील शाळा-कॉलेजमध्ये राबवली गेली पाहिजे व त्यादृष्टीने आयोजन कसे करावे याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले उद्घाटनाच्या कार्यक्रमाला तरुण कॉलेज वर्गाने उस्फूर्त प्रतिसाद दिला. सदर फेस्टिवलच्या दुसऱ्या दिवशी दिनांक १५ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ९.३० वाजता चित्रकला स्पर्धेचे हि आयोजन करण्यात आलेले असून विविध शालेय विद्यार्ध्यांना ह्या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळेल. या स्पर्धेतील सर्व सहभागींना प्रमाणपत्र देऊन व विजेत्यांना जगदीश थोरात, माजी वृक्षप्राधिकरण समितीचे सदस्य, ठा. म. पा. यांच्या हस्ते एकूण २५ बक्षीसे देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच दिनांक १५ डिसेंबर २०१९ रोजी संध्याकाळी ६.३० वाजता, प्रमुख पाहुणे म्हणून पल्लवी प. कदम, उप महापौर, ठा.म.पा व नम्रता संभेराव, फिल्म अभिनेत्री व इतर मान्यवर पाहुणे उपस्थित राहणार आहे. देशभरातून आलेल्या एकूण लघुचित्रपटांपैकी निवडक ६० लघुपटाचे स्क्रिनिंग यावेळी होणार आहे. या लघुचित्रपटामध्ये एकापेक्षा एक प्रतिभासंपन्न कलाकाराच्या अभिनयाने नटलेल्या लघुचित्रपटाच्या मेजवानीचा आस्वाद रसिक प्रेक्षकांना यावेळी अनुभवता येणार आहे. या महोत्सवावेळी लघुचित्रपटासाठी (शॉर्ट फिल्म) फिल्ममेकर्सना विविध विभागवार ३४ बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत. तसेच, या प्रसंगी ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना चित्ररत्न हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. ५ वा माय ठाणे शॉर्ट फिल्म फेस्टिवल डिसेंबर २०१९, नक्कीच रंगतदार व प्रेक्षणीय होणार यात काही शंकाच नाही तरीही जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी सदर शॉर्ट फिल्म फेस्टिवलचा आस्वाद घेण्यासाठी यावे व www.blueentertainment.in या संकेत स्थळावर संपर्क साधावा असे आवाहन ब्लू एंटरटेनमेंटचे, पार्टनर्स तर्फे एकनाथ पवळे यांनी केले. 

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक