ठाणे : शहरातील कायदा सुव्यस्था आबादीत राहावी, महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीला आळा बसावा तसेच शहरातील सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शहराच्या विविध भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. परंतु त्यातील तब्बल 50 टक्के कॅमेरे बंद असल्याचा धक्कादायक आरोप नुकत्याच झालेल्या महासभेत नगरसेवकांनी केला. दुसरीकडे वायफाय उपक्रम राबविणा-या ठेकेदाराने पालिकेचा हिस्सा अद्यापही दिला नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मागील दोन वर्षांत केवळ तीन हजार रुपये जमा झाल्याचे समोर आल्याने नगरसेवकांनी याबाबतही नाराजी व्यक्त केली.ठाणो महापालिका हद्दीत मागील वर्षी प्रभाग सुधारणा निधीतून 1200, वायफाय योजनेतून 100 असे 1300 कॅमेरे शहरातील विविध रस्त्यांवर बसविण्यात आले आहेत. तसेच यापूर्वी महापालिका आणि अन्य निधीतून 100 कॅमेरे बसविण्यात आले होते. तसेच अन्य 400 च्या आसपास कॅमेरे बसविण्यात येणार होते. शहरातील कायदा सुव्यस्था आबादीत राहावी, महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीला आळा बसावा तसेच शहरातील सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून शहराच्या विविध भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. परंतु काही वर्षांपुर्वी मोठा गाजावाजा करत शहरभर लावलेले कॅमेरे बंद असल्याची बाब सातत्याने समोर येत असतानाच, आता शहरातील 50 टक्के कॅमेरे बंद असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी शुक्रवारी झालेल्या महासभेत केला आहे. सर्व पक्षीय नगरसेवकांनी हा मुद्दा उचलून धरत याला समर्थन दिले. नगरसेवक निधीतून प्रत्येकी पाच लाख रु पये यासाठी खर्च करण्यात आला होता. परंतु हे कॅमेरे बंद पडल्याने त्याचा खर्च पाण्यात गेल्याची खंत नगससेवकांनी यावेळी व्यक्त केली.दरम्यान दुसरीकडे शहरात वायफाय योजनाही सुरु करण्यात आली आहे. सुरवातीला मोफत वायफाय सेवा दिल्यानंतर या योजनेतून काही ठराविक पैसे वापरकत्र्याला द्यावे लागणार होते. त्यातून जे उत्पन्न मिळणार होते, त्यातील काही टक्के हिस्सा हा महापालिकेला दिला जाणार होता. हे वायफाय चालविण्यासाठी खासगी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु संबधींत ठेकेदाराने तो हिस्सा अद्यापही पालिकेला दिला नसल्याचा दावा राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी केला. परंतु त्यासाठी तयार करण्यात आलेल्या स्वतंत्र खात्यात केवळ तीन हजार रु पये ठेकेदाराने जमा केले आहेत, अशी माहिती उपनगर अभियंता विनोद गुप्ता यांनी दिली. यानंतर सर्वपक्षीय नगरसेवक आक्र मक झाले आणि त्यांनी याप्रकरणी चौकशी समिती नेमण्याची मागणी केली. अखेर या योजनेतील त्रुटींचा अहवाल करून महोसभेपुढे सादर करण्यात येईल, असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी यावेळी दिले.
शहरातील कॅमे-यांच्या बाबतीत सध्या आम्ही मेटेंनेन्सचे काम पाहत आहोत, परंतु आतार्पयत कधीच 50 टक्के कॅमेरे बंद पडलेले नाहीत. कॅमेरे मॉनिटरिंगचे काम हे महापालिकेच्या माध्यमातूनच सुरु आहे. त्यामुळे या बाबत पालिकाच माहिती देईल. तर वायफायच्या बाबतीत 14.23 टक्के हिस्सा पालिकेला मिळणो अपेक्षित आहे, आम्ही तो हिस्सा देण्यास तयारही आहोत, मात्र पालिकेबरोबर झालेल्या करारानुसार पालिकेला इतर सेवादेखील देत आहोत, त्या सेवांच्या बदल्यात पालिका आम्हाला बाजारभावापेक्षा 25 टक्के रक्कम देणार होती. परंतु पालिकेने अद्यापही ती रक्कम दिलेली नाही. त्याबाबत पालिकेच्या अधिका:यांशी चर्चा सुरु असून त्यावर लवकरच तोडगा निघेल.(अमोल नलावडे - इनटेक्ट ऑनलाईन प्रा. लि. - संचालक)