शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्टिकल 370 वरून जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ, हाणामारी अन् पोस्टरही फाडलं; बघा VIDEO
2
"उद्धवजी नेता घरात नाही, तर लोकांच्या दारात शोभून दिसतो"; बावनकुळेंनी ठाकरेंना डिवचलं
3
“महाराष्ट्राला परिवर्तन हवे, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करावे लागेल”: शरद पवार
4
"अमेरिकन जनतेसाठी कमला हॅरिस चॅम्पियन आहेत, कायम राहतील"; जो बायडेन यांनी केलं कौतुक
5
"जिवंत राहिले तर आवश्य कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट!
6
"मित्रपक्षाने अशी दगाबाजी करणं..."; भास्कर जाधवांना संताप अनावर, काँग्रेसला सुनावलं
7
राज ठाकरेंच्या मनसेला आम्ही ऑफर दिली होती, पण...; CM एकनाथ शिंदेंचा दावा
8
ऑस्ट्रेलियात Dhruv Jurel नं राखली लाज; संघ अडचणीत असताना हा पठ्ठ्या एकटा लढला!
9
ममता बॅनर्जींचा भाचा पश्चिम बंगालचा पुढील मुख्यमंत्री होणार? अचानक राजकीय चर्चांणा उधाण
10
"तुला जीवाची पर्वा आहे की नाही?”; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने फॅशन डिझायनरला धमकी
11
शरद पवारांबाबत आक्षेपार्ह भाषा; टीकेची झोड उठल्यानंतर सदाभाऊंकडून दिलगिरी, म्हणाले...
12
Guruwar Astro Tips: कार्तिक महिन्यातला पहिला गुरुवार; झपाट्याने प्रगतीसाठी करा 'हे' चार उपाय!
13
भगीरथ भालकेंनी शरद पवारांशी गद्दारी केली; धैर्यशील मोहितेंची टीका; प्रणिती शिंदेंकडून पलटवार!
14
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
15
आधी आरोप, मग अजित पवारांना पवित्र करून घेतले, जयंत पाटील यांचे टीकास्र
16
"मला धमक्या मिळत आहेत...", विक्रांत मेस्सीचा खुलासा; 'द साबरमती रिपोर्ट' ठरलं कारण?
17
अशोक सराफ यांच्या नवीन मालिकेत 'ही' अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका, नव्या प्रोमोने उत्सुकता शिगेला
18
WI vs ENG: कार्टीच्या विक्रमी सेंच्युरीच्या जोरावर कॅरेबियन संघाची मालिका विजयाची 'पार्टी'
19
"राहुल गांधींनी नागपुरात कोरं संविधान दाखवलं तर मुंबईत..., बाबासाहेबांचा 'हा' अपमान..."; VIDEO शेअर करत भाजपचा हल्लाबोल
20
भाजपच्या ४० बंडखोरांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी, काही बंडखोरांवर अद्याप पक्षाकडून कारवाई नाही

लढा कोरोनाशी : सोसायटीत बनवले कोविड केअर सेंटर, ३५ रुग्णांनी घेतले उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 12:46 PM

सोसायटीचे सचिव सुनील घेडगे म्हणाले, सोसायटीत १७८ सदनिका आहेत. मार्चपासून आतापर्यंत सोसायटीतील ३५ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर उपचार व त्यांची आरोग्यविषयक काळजी घेण्यासाठी सोसायटीने पुढाकार घेतला.

कल्याण : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने जम्बो आरोग्य सोयीसुविधा उभारल्या आहेत. मात्र, पूर्वेतील रोझाली एलएक्स या सोसायटीने आपल्या आवारातच कोविड केअर सेंटर चालविल्याने सोसायटीतील ३५ रुग्णांवर उपचारासाठी अन्य कुठेही जाण्याची वेळ आली नाही. त्यामुळे घरच्याघरी राहून कोविडमुक्त होण्याचा आदर्श या सोसायटीने घालून दिला आहे. अन्य सोसायटीने हा आदर्श घेतल्यास महापालिकेच्या आरोग्यव्यवस्थेवरील ताण कमी होण्यास मदत होऊ शकते.

सोसायटीचे सचिव सुनील घेडगे म्हणाले, सोसायटीत १७८ सदनिका आहेत. मार्चपासून आतापर्यंत सोसायटीतील ३५ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर उपचार व त्यांची आरोग्यविषयक काळजी घेण्यासाठी सोसायटीने पुढाकार घेतला. त्यामुळे घरच्याघरीच राहून रुग्ण उपचार घेत आहेत. सोसायटीने प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझरची सुविधा केली होती. तसेच मास्कचे वाटप केले होते. सोसायटीतील रहिवासी डॉ. एस.पी. काकरमठ यांच्या मदतीने रुग्णांवर उपचार केले. 

त्याचबरोबर सोसायटीत कोरोना रुग्ण आढळल्यानंतर त्याला होम आयसोलेशन केले गेले होते. त्यामुळे त्याला व त्याच्या कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तू त्याच्या घरपोहोच देण्याची व्यवस्था करण्यात आली. त्याचबरोबर एकाच घरात तीन जणांना लागण झाल्यास त्यांच्या घरपोच सगळ्या जीवनावश्यक वस्तू पोहोचविल्या गेल्या होत्या. तसेच त्यांच्या घरी सोसायटीच्या नजीक असलेल्या एका पोळीभाजी केंद्रातून डबा दिला गेला. ते पुढे म्हणाले, एका घरात मुलगा, पत्नी व पती या तिघांना कोरोनाची लागण झाली. त्यांना त्यांच्या घरातच क्वारंटाइन केले गेले. मात्र, त्यांचे आईवडील हे वयोवृद्ध होते. आईचे वय ८० वर्षे तर वडिलांचे वय ८२ वर्षे होते. या दोघांना कोरोनाची सौम्य प्रकाराची लक्षणे दिसून आली. शेजारीच एक सदनिका रिक्त असल्याने या आजीआजोबांची त्या सदनिकेत राहण्याची व्यवस्था केली. 

कागदपत्रांची केली पूर्तता -एखाद्या रुग्णाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यावर त्याच्यासंदर्भात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे करावी लागणारी कागदपत्रांची पूर्तता पूर्ण करूनच सोसायटीत त्यांच्यावर उपचार केले गेले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणेkalyanकल्याण